Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आई-मुलाने सुपरमार्केटमधून चॉकलेट विकत घेतले, पॅकेट उघडताच नशीब उघडले

Webdunia
बुधवार, 15 डिसेंबर 2021 (17:47 IST)
चॉकलेट सहसा सर्वांनाच आवडते पण चॉकलेट कुणाचे नशीब फिरवू शकते असे कुठे पाहलंय का? होय, यावेळी खरोखरच असे काही घडले आहे. एका आईने चॉकलेट खरेदी केले आणि या चॉकलेटने तिला करोडपती बनवले. प्रत्यक्षात असे घडले की ही योजना एका सुपर मार्केटमध्ये सुरू होती. या योजनेंतर्गत चॉकलेट घेण्यासाठी गोल्डन तिकीट निघू शकतं अशी स्कीम होती. या तिकिटातून कुणाचे नशीब चमकणार होते. इंग्लंडमधील रहिवासी असलेल्या Sian Walker ने आपल्या मुलासोबत हे चॉकलेट खरेदी केले आहे. या तिकिटामुळे त्यांचे आयुष्य घडले.
 
एका माहितीनुसार, आई-मुलांनी मिळून डेअरीफाईन गोल्डन गिव्हवे चॉकलेट बार Aldi स्टोअरमधून विकत घेतला. यातूनच त्याला गोल्डन तिकीटही मिळाले. त्याची किंमत 5000 युरो ते 10,000 युरो पर्यंत असू शकते. 43 वर्षीय सियान सांगतात की, जेव्हा तिला समजले की तिने या तिकिटातून मोठी रक्कम जिंकली होती, तेव्हा तिचा आनंद गगनात जाऊन भिडला. ती म्हणते की आधी तिने चॉकलेटचे एक लहान पॅकेट उचलले, नंतर तिने आपल्या मुलासोबत शेअर करण्यासाठी एक मोठे पॅकेट उचलले. यामुळे त्यांचे नशीब खुलले.
 
आता या रकमेतून सियानला तिचे घर बनवायचे आहे. या घटनेबाबत ती म्हणते, 'मी सुरुवातीला माझ्या मुलासोबत मस्करी करत होते, आम्ही ते उघडले तेव्हा आतमध्ये सोन्याचे तिकीट होते.' अशातच चॉकलेट खरेदी केल्याने त्यांचे नशीब उलटे झाले. आणखी एका माहितीनुसार, गेल्या महिन्यात इंग्लंडमध्ये अशी 25 गोल्डन तिकिटे आली आहेत, ज्यामध्ये अनेकांनी लाखोंची बक्षिसे जिंकली आहेत. त्यामुळे ही बातमी खूप शेअर केली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

राज्य आर्थिक संकटातून जात आहे, विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर हल्लाबोल

आज मुंबई रामनामाने गुंजणार, श्री रामलला मूर्तीच्या स्थापनेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त धार्मिक विधींचे आयोजन

Alien city on earth: पृथ्वीवर एलियन्सनी एक शहर वसवले आहे, हे एलियन शहर कुठे आहे?

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments