suvichar

आता पाकिस्तानातही नोटबंदी

Webdunia
बुधवार, 21 डिसेंबर 2016 (14:05 IST)
काळ्या पैशावर नियंत्रणासाठी भारताने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे अनुकरण आता पाकिस्तानातही होणार आहे. पाकिस्तानातील डॉन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पाच हजाराची नोट बंद करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेत बहुमताने पारित करण्यात आला आहे. 
 
पाकिस्तान मुस्लीम लीगचे उस्मान सैफुल्लाह खान यांनी हा प्रस्ताव मांडला असल्याचे डॉन वृत्तपत्रात म्हटले आहे. पाच हजाराची नोट चलनातून रद्द केल्याने काळ्यापैशावर नियंत्रण आणणे सोपे होणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. तसेच अशा प्रकारांची नोटाबंदी दर तीन ते पाच वर्षांनी करण्यात यावी असेही सुचविण्यात आले आहे. 
 
नोटबंदीमुळे बँक अकाऊंटचाही वापर वाढण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. असे असले तरी पाकिस्तानचे कायदा मंत्री झाहिद हमीद यांनी, या निर्णयामुळे बाजारात आणि देशशत आर्थिक आपत्ती निर्माण होईल आणि पाच हजाराची नोट उपलब्ध नसल्याने परकीय चलानाचा वापर वाढेल, असे म्हटले आहे. 
 
बाजारात सध्या 3.4 लाख कोटींच्या नोटा चलनात असून यामध्ये 1.02 लाख कोटी पाच हजारांच्या नोटांचे स्वरूपात असल्याची माहिती देखील  त्यांनी दिली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार

भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यासाठी आणि महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी मुंबईहून रवाना

"बच्चू कडू यांना मंत्री म्हणून नियुक्त करणे ही माझी खूप मोठी चूक होती" म्हणाले-उद्धव ठाकरे

रविवारी मेन आणि हार्बर लाईनवर मध्य रेल्वे कडून मेगा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द

महाराष्ट्र बोर्डाची नवी योजना, इयत्ता १०वी ते १२वीच्या बोर्ड परीक्षा डिजिटल पद्धतीने घेणार

पुढील लेख
Show comments