rashifal-2026

पाकची प्रतिमा ’26/11च्या हल्ल्यामुळे मलीन झाली’

Webdunia
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017 (11:23 IST)
भारतावर पाककडून करण्यात आलेल्या 26/11 च्या  हल्ल्यामुळे आपली प्रतिमा जगभरात मलीन झाली असल्याचे पाकिस्तान सांगत आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव रियाज मोहम्मद खान यांनी सांगितले की ,या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या काश्मिर मोहिमेला खूप मोठे नुकसान झाले असून,जगभरात पाकिस्तानची प्रतिमा मलीन झाली आहे.26 सप्टेंबर 2008 रोजी पाकिस्तानच्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत सागरी मार्गे घुसून दहशतवादी हल्ला केला. यात परदेशी नागरिकांसह 166 जणांचा बळी गेला होता.
 
रियाज मोहम्मद खान यांनी मुंबई हल्ल्यांवरील हे  वक्तव्य वॉशिंग्टन येथे पाकिस्तानच्या दूतावासात केले आहे. या कार्यक्रमात पाकिस्तानचे इतर महत्वाचे मुत्सद्दी अधिकारी आणि नागरिक देखील उपस्थित होते.  खान यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख करताना आपल्या देशाची इमेज जगभरात मलीन झाली असे म्हटले आहे. यासोबतच या हल्ल्यामुळे पाकिस्तानची जगात जी इमेज तयार झाली त्यामुळे काश्मिर आणि इतर मोहिमांना मोठे नुकसान झाले असून त्याची भरपाई कधीच करता येणार नाही असेही ते म्हणाले रियाज मोहम्मद खान हे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव असून सध्या ते  जॉर्जटाउन विद्यापीठात प्राध्यापक आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

भाजप आणि शिवसेना नगरसेवक त्यांचा नेता निवडण्यासाठी बैठक घेणार, अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

LIVE: महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली

महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा योजना जाहीर केली

संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हटले? ज्यावर पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments