Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तालिबानी मृतदेहासोबतही लैंगिक संबंध बनवतात, पळून वाचलेल्या महिला पोलिसाने भीतीदायक सत्य सांगितले

Webdunia
सोमवार, 23 ऑगस्ट 2021 (12:42 IST)
आठवड्यापूर्वी अफगाणिस्तानवर काबीज केलेल्या तालिबान्यांच्या क्रूरतेची आणि जुलमीपणाची जगाला जाणीव आहे. महिलांवरील त्यांचे अत्याचारही नवीन नाहीत. तालिबान्यांनी पकडण्यापूर्वी भारतात पळून आलेल्या महिलेने केलेले खुलासे धक्कादायक आहेत. महिलेने आरोप केला की तालिबानी लोक इतके क्रूर आहेत की ते महिलांच्या मृतदेहांसमवेत लेंगिक संबंध बनवतात. तसेच, त्यांना अफगाणिस्तानातील प्रत्येक घरातून एक मुलगी हवी आहे.
 
अफगाणिस्तानातून आलेली, दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने एका मीडियासंस्थेला या गोष्टी सांगितल्या आहेत. एकेकाळी पोलिसात असलेल्या या महिलेला तालिबानच्या भीतीमुळे अफगाणिस्तान सोडावे लागले.ती म्हणाली, "आम्हाला तिथे धमकी देण्यात आली होती की जर तुम्ही कामावर गेलात तर तुमचे कुटुंब धोक्यात आहे, तुम्ही धोक्यात आहात. ते चेतावणी देतात आणि आपण सहमत नसलो तर एकतर त्यांना उचलून नेतात किंवा येऊन डोक्यात गोळी घालतात.
 
काबुलमध्ये तैनात असलेल्या या महिले सोबत काम करणाऱ्या महिलेचे काय झाले हे आठवून ती घाबरली आहे.ती म्हणाली , "20-25 दिवसांनंतर जेव्हा मृतदेह सापडतो, तेव्हा ते मृतदेहासोबत लैंगिक संबंध बनवतात, ते मृतदेह आहे असे ते समजतच नाही आणि ते मृतदेहासोबत देखील लैंगिक संबंध बनवतात.आपण  याची कल्पना करू शकता का? "
 
ती महिला म्हणाली की, तालिबानी लोकांनी तिच्या सहकाऱ्याचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून मृतदेह कुटुंबाला परत देऊन, पोलिस किंवा सरकारशी मिळून कोणीही काही केले तर त्याच्यासोबत असेच होईल अशी धमकी दिली. यानंतरच तिने अफगाणिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. ती महिला पुढे म्हणाली, "त्यांना प्रत्येक घरातून मुलगी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे. एकतर मुलगी द्या नाहीतर संपूर्ण कुटुंबाला ठार करतात. अगदी 10-12 वर्षांच्या मुलींनाही उचलून नेले जाते. ”ती म्हणते की तालिबान मीडियासमोर म्हणत आहे की आम्ही बदललो आहोत हे खरे नाही सर्व देखावा आहे.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख