Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जगातील सर्वात वृद्ध महिलेचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन

Webdunia
बुधवार, 18 जानेवारी 2023 (09:47 IST)
जगातील सर्वात वयोवृद्ध महिला ल्युसिल रँडन यांचे वयाच्या 118 व्या वर्षी निधन झाले आहे. रँडनला सिस्टर आंद्रे या नावाने ओळखले जाते. माहितीनुसार, रँडनचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला होता. सेंट-कॅथरीन-लेबरी नर्सिंग होमचे प्रवक्ते तावेला यांनी ही  माहिती दिली. ते म्हणाले जगातील सर्वात वृद्ध महिला असलेल्या फ्रेंच नन लुसिल रँडन यांचे निधन झाले आहे.  तोलॉन येथील नर्सिंग होममध्ये झोपेतच त्याचा मृत्यू झाला.
 
टुलॉनचे महापौर हबर्ट फाल्को यांनी ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी लिहिले, आज रात्री जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे निधन झाले. खूप दु:ख आणि वेदनादायक आहे
.
सेंट-कॅथरीन-लेबरी नर्सिंग होमचे प्रवक्ते तावेला म्हणाले की हे खूप दुःखदायक आहे. पण रॅन्डनची एकच इच्छा होती की आपल्या प्रिय भावाला भेटावे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, जपानच्या केन तनाका यांचे वयाच्या 119 व्या वर्षी निधन झाले. यानंतर, रँडन या सर्वात वयोवृद्ध महिला होत्या. रँडनचा जन्म 11 फेब्रुवारी 1904 रोजी दक्षिण फ्रान्समध्ये झाला त्यांना सिस्टर आंद्रे या नावानेही ओळखले जात असे.
 
वयाच्या 40 व्या वर्षी 1944 मध्ये कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रँडन यांनी प्रशासक आणि शिक्षक म्हणून काम केले. 1979 पासून त्या नर्सिंग होममध्ये आणि 2009 पासून टूलॉन होममध्ये होत्या.
 
नुकतेच रँडन म्हणाल्या  होत्या की लोक म्हणतात काम हे माणसाला मारते, पण माझ्यासाठी कामाने मला जिवंत ठेवले. मी वयाच्या 108 व्या वर्षापर्यंत काम करत होते. 2021 मध्ये ल्युसिल रँडन कोविड पॉझिटिव्ह झाल्या आणि त्यातून बरे होऊन त्यांनी जगासमोर आदर्श ठेवला. 
 
गेल्या वर्षी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जपानचे केन तनाका यांचे निधन झाले. ते 119 वर्षांचे होते. तनाकाच्या मृत्यूनंतर, 118 वर्षीय सिस्टर लुसिली रँडन जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती होत्या.
 
Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments