Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इंटरव्हयू देण्यापूर्वी काळजी करत आहात,अशा प्रकारे तयारी करा

Webdunia
शुक्रवार, 18 जून 2021 (20:16 IST)
आपण कोणत्याही पातळीचा आणि कोणत्याही पदासाठी इंटरव्ह्यू देत आहात ,हा  इंटरव्यू किंवा मुलाखत तिसरी असो किंवा चवथी कोणी ही इंटरव्यूला जाण्याच्या पूर्वी चिंताग्रस्त असतं.आणि असं होणं स्वाभाविकच आहे.जर आपल्या मनात देखील मुलाखत मधील आपली निवड होण्या बद्दल काही प्रश्न आहेत ,तर मुलाखत प्रभावपूर्ण देण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊ या.
 
1 केवळ पदासाठी पात्र असल्यामुळे आपली निवड होईल असं नाही.या साठी आपले व्यक्तिमत्त्व देखील प्रभावी असले पाहिजे.या साठी आपल्याला आपल्या लूक कडे देखील लक्ष दिले पाहिजे.
 
2 आपण स्वतःला आणि आपल्या गोष्टींची मांडणी इंटरव्यू मध्ये कशी करता, हे मुलाखतीत आपल्या यशासाठी खूप महत्त्वाचे आहे.
 
3 बऱ्याचदा इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला जातो की येत्या 5 वर्षात आपण स्वतःला कुठे बघता? हे प्रश्न आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठी विचारले जातात.म्हणून आपली उत्तरे आत्मविश्वासाने भरलेली आणि तार्किक असावी.
 
4 इंटरव्ह्यू ला जाताना हे लक्षात ठेवा की ''फर्स्ट इम्प्रेशन इज दि लास्ट इम्प्रेशन''बऱ्याच वेळा आपले परिधान देखील आपले काम खराब करतात.म्हणून मुलाखतीला जाताना कपडे नेहमी इस्त्री केलेले आणि  नेहमी फॉर्मल कपडे घाला.
 
5 कॅज्युअल आणि फंकी कपडे घालून मुलाखतीला जाणे मूर्खपणा आहे. कारण आपण जे परिधान करता त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होते.म्हणून नेहमी कपड्यांची निवड जाणीवपूर्वक करावी आणि आपण सभ्य दिसाल असे कपडे निवडावे.
 
6 चिंता करणे काही वाईट नाही परंतु या मुळे खाणंपिणं सोडून मुलाखतीस जाणं चांगले नाही.असं केल्याने तब्बेत खराब होण्याची शक्यता असते.म्हणून नेहमी हलकं अन्न खाऊनच मुलाखतीला जावे.
 
7 हॉलच्या आत जाण्यापूर्वी दीर्घ श्वास घेऊन आरामात जावे.मुलाखतीस जाण्यापूर्वी आपली सखोल योजना आखावी,जाण्यापूर्वी सर्व महत्त्वाची कागदपत्रे काळजीपूर्वक घ्या. हॉल मध्ये जाताना तोंडात च्युईंगम किंवा इतर काही ठेवू नका.
 
8 आपल्या सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींची नेहमी काळजी घ्या.नेहमी मुलाखतीत आपला कमकुवतपणा लपवू नका. हे अवश्य सांगा की आपण आपल्या नकारात्मक बिंदूंना ओळखता आणि ते नकारात्मक बिंदू आपल्याला आपल्यातून बाहेर काढायचे आहे. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

भरलेले लाल मिरचीचे लोणचे रेसिपी

छत्रपती शिवाजी महाराज निबंध मराठी Essay On Chhatrapati Shivaji Maharaj

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विचारले जाणारे प्रश्‍न

कॉर्न मेथी मसाला रेसिपी

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes

पुढील लेख
Show comments