rashifal-2026

कार्तिक यशस्वी होणार की वॉर्नरची बॅट तळपणार : आज कोलकाताविरुध्द हैदराबाद यांच्यात लढत

Webdunia
शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (13:53 IST)
आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या योजनांवर टीका झाली. त्यामुळे आज (शनिवारी) येथे होणार्या सनरायझर्स हैदराबादविरूध्दच्या सामन्यात केकेआर विजयाचे खाते उघडण्याचा प्रयत्न करेल. केकेआरने मागील सत्राच्या तुलनेत अनेक बदल केले, मात्र बुधवारी मुंबई इंडियन्सविरूध्दच्या सामन्यात त्यांचे आडाखे पाहिल्यानंतर वाटते की, कार्तिकने मागील चुकांमधून धडा घेतलेला नाही.
 
तडाखेबाज फलंदाजी करणार आंद्रे रसेलच्या मुंबईविरूध्दच्या सामन्यातील फलंदाजीच्या क्रमाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले. मागील सत्रात 510 धावा करणारा हा जमैकाचा फलंदाज सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्यावेळी केकेआरच्या अडचणी वाढल्या होत्या.
 
विश्वचषकविजेता कर्णधार इयॉन मॉर्गनही चमक दाखवू शकला नाही. दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादची स्थितीही पहिल्या सामन्यात चांगली राहिली नाही. बंगळुरूविरूध्द त्यांची मधलीफळी कोलमडून पडली. त्यांचा संघ 10 धावांनी पराभूत झाला. शिवाय हैदराबादसाठी दुसरा धक्का म्हणजे अष्टपैलू खेळाडू मिशेल मार्श दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.
सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वाजता

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा ऋषभ पंतचा विक्रम मोडला

४० वर्षांचा शिखर धवन आयरिश प्रेयसीशी दुसऱ्यांदा लग्न करणार.

शिखर धवन परत अडकणार लग्नबंधनात

वैभवच्या १० षटकारांच्या स्फोटक खेळीमुळे भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ गडी राखून विजय

एसआयआर फॉर्ममधील विसंगतींबद्दल निवडणूक आयोगाने मोहम्मद शमीला नोटीस बजावली

पुढील लेख
Show comments