Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

GT vs LSG : आज पंड्या विरुद्ध पंड्या, 'या' आहेत IPL मधील भावांच्या जोड्या

Webdunia
रविवार, 7 मे 2023 (16:52 IST)
आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन भाऊ एकमेकांविरुद्ध संघांचं नेतृत्व करत आहेत.
हार्दिक गुजरात टायटन्स संघाचं तर कृणाल लखनौ सुपरजायंट्स संघाचं नेतृत्व करत आहे. लखनौचा कर्णधार के.एल.राहुल दुखापतग्रस्त झाल्याने कृणालकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.
 
हार्दिक आणि कृणाल अनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होते. मात्र आता ते दोन वेगळ्या संघांमध्ये आहेत.
 
यानिमित्ताने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या भावाभावांविषयी जाणून घेऊया.
 
हार्दिक आणि कृणाल पंड्या
पंड्या ब्रदर्स मुंबई इंडियन्सकडूनच खेळतात. हार्दिकने 2015 मध्ये तर कृणालने 2016 मध्ये मुंबईसाठी पदार्पण केलं. खणखणीत पल्लेदार षटकार लगावणं, मोक्याच्या क्षणी विकेट्स काढणं आणि अफलातून फिल्डर ही हार्दिकची ओळख आहे.
 
एकहाती मॅचेस जिंकून हार्दिकने मुंबईच्या पॉवरफुल संघात स्वत:चं स्थान निर्माण केलं. डावखुरा फिरकीपटू असणाऱ्या कृणालने भल्याभल्या बॅट्समनला आपल्या जाळ्यात फसवलं आहे.
 
विकेट्सच्या बरोबरीने रनरेटला ब्रेक लावण्यात कृणालचा महत्त्वाचा वाटा आहे. बॉलिंगबरोबरीने कृणालने उपयुक्त अशा खेळीही केल्या आहेत. सातत्यपूर्ण खेळाच्या बळावर हे दोघं मुंबईच्या संघाचा अविभाज्य भाग झाले आहेत. मुंबईसाठी दमदार कामगिरीच्या बळावरच हार्दिकसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले.
मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर हार्दिकला गुजरात टायटन्सने ताफ्यात घेतलं आणि कर्णधारपद दिलं. संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत हार्दिकने पहिल्याच मोहिमेत संघाला जेतेपद पटकावून दिलं. हार्दिकची स्वत:ची कामगिरीही उत्तम झाली. संघाची मोट बांधण्यात तो यशस्वी ठरला.
 
दुसरीकडे मुंबईने रिलीज केल्यानंतर कृणालला लखनौ सुपरजायंट्स संघाने समाविष्ट केलं. अष्टपैलू असल्याने कृणाल लखनौ संघाचा नियमित भाग असतो.
 
सॅम आणि टॉम करन
शुक्रवारी झालेल्या लिलावात आयपीएल लिलावाच्या इतिहासातली सर्वोच्च बोली सॅम करनसाठी लागली. पंजाब किंग्ज संघाने सॅमसाठी तब्बल 18.50 कोटी रुपये मोजले. सॅम याआधी पंजाब आणि चेन्नई संघाकडून खेळला आहे. ट्वेन्टी20 वर्ल्डकप स्पर्धेत फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅचसह मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारावर त्याने नाव कोरलं होतं. सॅमचा भाऊ टॉमही आयपीएलमध्ये खेळला आहे. झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू केव्हिन करन यांची ही दोन मुलं.
 
सॅम आणि टॉम यांच्या बरोबरीने बेन करनही क्रिकेट खेळतो. सॅम डावखुरा फास्ट बॉलर आहे. दोन वर्षांपूर्वी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता, त्यावेळी सॅम करनच्या बॉलिंग आणि उपयुक्त बॅटिंगने टीम इंडियाचा विजय हिरावून घेतला होता.
टॉम उंचपुरा फास्ट बॉलर आहे. तो उजव्या हाताने बॉलिंग करतो. गेल्या हंगामात सॅम पंजाबकडून खेळला होता. दिल्लीविरुद्ध खेळताना त्याने हॅट्ट्ट्रिक घेतली होती. मात्र तरीही पंजाबने त्याला कायम राखलं नाही. यंदा तो चेन्नईकडून खेळतो आहे.
 
दोन वर्षांपूर्वी कोलकाताने मिचेल स्टार्कला माघार घेतल्यामुळे टॉमला संघात समाविष्ट केलं. तो 5 मॅच खेळला. यंदा तो राजस्थानकडून खेळतो आहे. मंगळवारी झालेल्या मॅचमध्ये सॅम बॉलिंग करत असताना टॉम बॅटिंग करत होता.
 
इरफान आणि युसुफ पठाण
घरच्यांची इच्छा असली तरी इरफान आणि युसुफ यांना आयपीएल स्पर्धेत एकदाही एकत्र खेळण्याची संधी मिळालेली नाही. डावखुरा स्विंग फास्ट बॉलर असलेला इरफान चेन्नई, दिल्ली, पंजाब, पुणे आणि हैदराबाद अशा पाच संघांकडून खेळला.
 
सुरुवातीच्या हंगामांमध्ये इरफान ज्या संघांसाठी खेळला त्यांच्यासाठी नवीन बॉल हाताळण्याचं काम त्याने केलं. परंतु बॅट्समनच्या टोलेजंग फटकेबाजीसाठी प्रसिद्ध या स्पर्धेत इरफान एका विशिष्ट संघासाठी स्थिरावू शकला नाही. 80 विकेट्स आणि 1139 रन्स अशी समाधानकारक कामगिरी इरफानच्या नावावर आहे.
 
पहिल्या हंगामात युसुफ पठाण राजस्थानच्या विजयी मोहिमेचा भाग होता. त्याने 435 रन्स केल्या आणि 8 विकेट्सही पटकावल्या. तिसऱ्या हंगामात युसुफ पठाणने मुंबईत तडाखेबंद शतक आहे. त्यानंतर तो सात हंगाम कोलकाताकडून खेळला. कोलकातासाठी छोट्या पण उपयुक्त खेळी करण्यासाठी तो प्रसिद्ध होता.
 
हैदराबादसाठी त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. 2020 आयपीएल लिलावात युसुफला कोणत्याही संघाने समाविष्ट केलं नाही.
 
अल्बी आणि मॉर्ने मॉर्केल
 
दक्षिण आफ्रिकेच्या या बंधूजोडीने आयपीएल स्पर्धेत विविध संघांच्या जेतेपदापर्यंतच्या प्रवासात निर्णायक भूमिका बजावली. चांगली बॉलिंग, उपयुक्त बॅटिंग आणि दर्जेदार फिल्डिंग यामुळे अल्बी चेन्नईच्या संघाचा नियमित भाग असे. चेन्नईने 2010 आणि 2011 मध्ये जेतेपद पटकावलं त्या संघाचा अल्बी भाग होता.
 
2012 मध्ये विराट कोहलीच्या बॉलिंगवर अल्बीने 28 रन्स कुटल्या होत्या. चेन्नईसाठी कामगिरी खालावल्यानंतर बेंगळुरूने त्याला संघात घेतलं पण तिथे त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दिल्लीकडून नशीब आजमवल्यानंतर अल्बी पुण्याकडूनही खेळला.
 
दुसरीकडे उंचपुरा मॉर्ने तीन हंगाम राजस्थानसाठी खेळला. त्यानंतर दिल्ली आणि कोलकाताकडूनही खेळला. 8 हंगामात मिळून मॉर्नेच्या नावावर 77 विकेट्स आहेत.
 
शॉन आणि मिचेल मार्श
 
आयपीएलच्या पहिल्याच हंगामात सर्वाधिक रन्स करण्यासाठीचा ऑरेंज कॅप पुरस्कार शॉन मार्शने पटकावला होता. कलात्मक शैलीदार बॅटिंगसाठी प्रसिद्ध शॉन किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी 2008 ते 2017 इतका प्रदीर्घ काळ खेळला. पंजाबसाठी खेळताना मार्शच्या नावावर 2477 रन्स आहेत. यामध्ये एक शतक आणि 20 अर्धशतकांचा समावेश आहे. भारतीय बॅट्समन स्पर्धा गाजवत असताना एका बाजूने संयमीपणे शॉन रन्स करत राहिला.
 
खेळण्यापेक्षा दुखापतींमुळे अनेक पटींनी मॅचेस खेळू न शकणं हा शाप मिचेल मार्शच्या नशिबी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आयपीएल स्पर्धेत मिचेलला सातत्याने दुखापतींचं ग्रहण असतं. डेक्कन चार्जर्स, पुणे, हैदराबाद अशा संघांसाठी मिचेल खेळला. मात्र कुठल्याच संघाकडून नियमितपणे खेळू शकला.
 
हैदराबादने यंदाच्या आयपीएलसाठी त्याला संघात घेतलं मात्र पहिल्याच मॅचमध्ये पहिला बॉल टाकल्यावर मिचेल दुखापतग्रस्त झाला. पायाला गंभीर दुखापत होऊनही केवळ संघाची गरज म्हणून तो बॅटिंगला आला. ही दुखापत गंभीर असल्याने मिचेल स्पर्धेतील उर्वरित मॅचेस खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं.
 
माईक आणि डेव्हिड हसी
चेन्नई सुपर किंग्सचा हुकूमी एक्का अशी माईक हसीची ख्याती होती. स्पर्धेतलं दुसरं शतक झळकावण्याचा मान माईकच्या नावावर आहे. 2010 मध्ये विजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा माईक अविभाज्य भाग होता. 2013 मध्ये माईकने 733 रन्स करत ऑरेंज कॅपचा पुरस्कार पटकावला.
 
एक हंगाम मुंबईसाठी खेळल्यानंतर माईक पुन्हा चेन्नईकडे परतला. खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर माईक चेन्नईचा बॅटिंग कोच झाला आहे. डेव्हिड हसी पहिल्या तीन हंगामात कोलकाताकडे होता.
 
आक्रमक बॅटिंग आणि कामचलाऊ स्पिन बॉलर ही डेव्हिडची ओळख. पंजाब आणि चेन्नई यांच्याकडूनही डेव्हिड खेळला मात्र तितका प्रभावी ठरला नाही.
 
ब्रेंडन आणि नॅथन मॅक्युलम
2008 मध्ये आयपीएल स्पर्धा सुरू झाली तेव्हा देश-विदेशातले खेळाडू एकत्र खेळणार अशी चर्चा होती. पण ही स्पर्धा नेमकी कशी असणार याची कोणालाच कल्पना नव्हती.
 
स्पर्धेचं प्रारुप चाहत्यांच्या मनात ठसण्यासाठी काहीतरी ऐतिहासिक घडणं आवश्यक होतं. तेव्हा कोलकाताकडून खेळणाऱ्या ब्रेंडनने पहिल्याच मॅचमध्ये 73 बॉलमध्ये 158 धावांची अविश्वसनीय खेळी साकारत भारतात आयपीएलचा पाया रचला. आयपीएलच्या संस्मरणीय खेळींमध्ये ही खेळी अग्रगण्य मानली जाते.
 
कोलकातानंतर ब्रेंडन कोची आणि चेन्नईकडून खेळला. बदली संघ म्हणून आलेल्या गुजरात लायन्सचाही तो भाग होता. खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ब्रेंडन यंदा कोलकाता संघाचा मुख्य कोच आहे.
 
ब्रेंडनच्या तुलनेत नॅथनचं आयपीएल करिअर बहरलं नाही. पुणे आणि हैदराबाद संघाकडून खेळला पण त्याला फारशा संधीच मिळाल्या नाहीत.
 
ड्वेन आणि डॅरेन ब्राव्हो
बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंमध्ये ड्वेन ब्राव्होचा समावेश होतो. चेन्नईला जेतेपद जिंकून देण्यात ड्वेनची महत्त्वाची भूमिका होती.
 
मुंबई संघाच्या यशातही ड्वेनचा वाटा होता. हाणामारीच्या टप्प्यात बॉलिंग करणं ड्वेनची खासियत आहे. रनरेट वाढत जात असताना विजयश्री खेचून आणणं ड्वेनला आवडतं. अतिशय चपळ असा फिल्डर असल्याने ड्वेन हा प्रत्येक संघाचा अविभाज्य भाग आहे.
 
डॅरेन स्पर्धेत नियमितपणे खेळत नाही. डेक्कन चार्जर्ससाठी खेळायचा. कोलकाताने त्याला समाविष्ट केलं पण तो लौकिकाला साजेशी बॅटिंग करू शकला नाही.
 
दीपक आणि राहुल चहर
राजस्थानसाठी दिमाखदार रणजी पदार्पणानंतर रॉयल्सने दीपकला संधी दिली. धोनीच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि नंतर चेन्नईसाठी खेळताना पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणारा चतुर बॉलर अशी दीपकची ओळख झाली आहे.
 
यंदाच्या आयपीएलसाठी चेन्नईचा संघ युएईत पोहोचला. त्यानंतर 14 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यात दीपकचा समावेश होता. मात्र त्याच्या दुसऱ्या चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याने तो खेळण्यासाठी पात्र ठरला.
 
राहुलने आयपीएलचा शुभारंभ 2017मध्ये पुण्याकडून खेळताना केला. मुंबई इंडियन्ससाठी खेळताना त्याने आपल्या फिरकीने सगळ्यांना प्रभावित केलं आहे.
 
आयपीएलमध्ये जुळ्या भावांची जोडी
आयपीएल स्पर्धेत 17 एप्रिल 2023 रोजी एक अनोखा विक्रम झाला. जुळे भाऊ स्पर्धेत खेळण्याचा विक्रम झाला. मार्को यान्सन सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो तर ड्युआन यान्सन मुंबई इंडियन्सकडून खेळतो आहे. 17 एप्रिलला मुंबईने ड्युआन यान्सनला पदार्पणाची संधी दिली. जुळे भाऊ स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
 
लिलावात मुंबई इंडियन्स संघाने ड्युआन यान्सला संघात समाविष्ट केलं. या व्यवहाराबरोबरच आयपीएलच्या नव्या हंगामात जुळ्या भावांची जोडी खेळताना दिसेल. आयपीएल स्पर्धेत भावांनी खेळणं नवीन नाही पण आता एकसारखेच दिसणारे जुळे भाऊ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.
 
सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात मार्को यान्सन आहे तर मुंबईकडे ड्युआन यान्सन आहे. योगायोग म्हणजे मार्को काही हंगामांपूर्वी मुंबईकडेच होता. मार्को नसल्याची उणीव मुंबईने त्याच्यासारख्याच उंचपुऱ्या डावखुऱ्या ड्युआनच्या रुपात भरुन काढली आहे.
 
मार्कोने 8 टेस्ट, 3 वनडे आणि एका ट्वेन्टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. सहा फूटांहून जास्त उंची लाभलेल्या मार्कोचा सामना करणं भल्याभल्या फलंदाजांनाही कठीण जातं.
 
ड्युआनही डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने 16 फर्स्टक्लास सामने खेळलेत. 27 ट्वेन्टी20 सामन्यात सहभागी झाला आहे. मार्कोच्या तुलनेत ड्युआनकडे अनुभव कमी असला तरी वेग आणि अचूकता तेवढीच असल्याने प्रतिस्पर्धी संघांसाठी तो डोकेदुखी ठरु शकतो.

Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला

रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

पुढील लेख