Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2023: आशिष नेहरा- हार्दिक पांड्या यांच्यात वाद, शुभमन गिलचंही नाही केलं अभिनंदन

Webdunia
बुधवार, 17 मे 2023 (11:24 IST)
आशिष नेहरा जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचा तेव्हा बॉलिंग करताना तो अचानक आक्रमक व्हायचा.
बॉलिंग करताना विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीवर नाराज होणाऱ्या आशिष नेहराचा जुना व्हीडिओ नेहमीच व्हायरल होतो.त्यावेळी धोनी नवीन होता आणि आशिष नेहरा थोडा आधीच्या काळातला.
तसं तर आशिष नेहराच्या मैदानावरच्या नाराजीचे, आक्रमकतेचे एक-दोन अपवाद वगळता फार किस्से नाहीयेत.
तरी त्याच्या जुन्या गोष्टी अशासाठी उकरून काढल्या जात आहेत, कारण सोमवारी (15 मे) आयपीएल मॅचच्या दरम्यान त्याची नाराजी हा चर्चेचा विषय झाला आहे.
 
यादरम्यान गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या बरोबर झालेली त्याची चकमक बातम्यांचा विषय झाली आहे.
 
आशिष नेहरा आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स टीमचा कोच आहे.
 
गुजरात टायटन्सने मागच्या वर्षी पहिल्याच सीझनमध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकाी आहे. तेव्हापासून हार्दिक पांड्या आणि आशिष नेहरा यांची चर्चा जोरात आहे.
सध्याच्या आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये जागा तयार करणारी गुजरातची ही पहिलीच टीम आहे.
 
नेमकं झालं काय?
सोमवारी (15 मे) गुजरात टायटन्सच्या टीमची मॅच सनरायझर्स हैदराबादबरोबर होती.
 
अहमदाबाद येथे झालेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये झालेल्या मॅचमध्ये गुजरात टीमने पहिल्यांदा बॅटिंग करत नऊ विकेट गमावून 188 रन्स केले.
 
हैदराबादच्या टीमला 154 रन्स करता आल्या आणि गुजरातची टीम जिंकली.
 
त्याबरोबरच गुजरातची टीम आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये जाणारी पहिली टीम झाली आहे.
 
हैदराबाद विरुद्ध शुभमन गिलने शानदार शतक झळकावलं.
 
शुभमनने शतक झळकवल्याबरोबर सगळ्यांनी त्याचं अभिनंदन केलं. मात्र आशिष नेहराने त्याचं अभिनंदन केलं नाही, आशिष नेहराची नाराजी यावेळी दिसत होती.
 
त्यानंतर त्याला अचानक संताप आला आणि हार्दिक पंड्याबरोबर त्याची चकमकही झाली.
 
गुजरातची पहिली विकेट लवकर पडली. त्यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शनने दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. एक वेळ असं वाटत होतं की गुजरातच्या टीमचा स्कोर 200 च्या पुढे आरामात जाईल.
 
मात्र असं झालं नाही. गुजरातच्या टीमने शेवटच्या तीन ओव्हर्समध्ये सहा विकेट गमावल्या.
 
गुजरातच्या इनिंगमध्ये हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने शेवटचा ओव्हर टाकला आणि त्या ओव्हरमध्ये गुजरातच्या टीमने चार विकेट गमावल्या.
 
शेवटच्या ओव्हरमध्ये गुजरातला फक्त दोन रन्स करता आल्या.
 
फलंदाजांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून आशिष नेहरा नाराज आहे, असं सांगितलं जात आहे.
 
गुजरातची इनिंग संपल्यानंतर आशिष नेहराची हार्दिक पांड्याशी चकमक झाली. टीमचे संचालक विक्रम सोळंकी यांनी हार्दिक पंड्याला शांत रहायला सांगितलं.
नेहराची नाराजी आणि कॅप्टन हार्दिक पांड्याशी त्याचा वाद सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. लोक लिहिताहेत की, आशिष नेहरा इतका रागात होता की तो हार्दिक पांड्याचं ऐकतही नव्हता.
सर्कल ऑफ क्रिकेटने लिहिलंय की, गुजरातच्या बॅटिंगने कोच नेहरा खूश नव्हता.
 
आशिष नेहराच्या नाराजीवर अनेकांनी ट्वीट केलं आहे.
 
या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सची वाटचाल
गेल्यावर्षीचा विजेता गुजरात टायटन्सने आतापर्यंत आयपीएल मध्ये 13 मॅचेस खेळला आहे.
त्यापैकी नऊ मॅचमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. चार मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
नऊ विजयासह त्यांनी प्ले ऑफ मध्येही स्थान निर्माण केलं आहे.
यावेळी गुजरातच्या टीमने काही उत्कृष्ट मॅचेस खेळल्या, काही खेळाडूंचं वैयक्तिक प्रदर्शनसुद्धा चांगलं होतं.
 
त्यांनी यावेळी राजस्थानला नऊ विकेटने हरवलं, कोलकाताच्या टीमला सात विकेटने हरवलं आणि मुंबईच्या टीमला 55 रन्सने हरवलं. हे त्यांचे विशेष विजय होते.
त्याशिवाय गुजरातच्या खात्यात अनेक महत्त्वाचे विजय होते.
बॉलिंगचा विचार केला तर आयपीएलमध्ये मोहम्मद शमीने उत्कृष्ट खेळ केला.
23 विकेटसह आयपीएलमध्ये सर्वांत जास्त विकेट घेणारा बॉलर झाला आहे.
त्याशिवाय या सीझनमध्ये मोहित शर्माने त्याच्या बॉलिंगने चांगलाच प्रभाव पाडला आहे.
बॅटिंगचा विचार केला तर कॅप्टन हार्दिक पंड्याने चांगला खेळ केला नाही तरी शुभमन गिलने चांगली बॅटिंग केली आहे. फॅब डुप्लेसीने ही चांगली बॅटिंग केली आहे.
त्याशिवाय डेव्हिड मिलर, श्रीकांत भरत, विजय शंकर, साई सुदर्शन यांनीही चांगली बॅटिंग केली आहे.
मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये रशिद खानने इतकी चांगली बॅटिंग केली की सगळ्यांनी त्याची स्तुती केली.
रशिद खानने फक्त 32 बॉलमध्ये 79 रन्स केले. त्याने 10 सिक्सर मारले.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर इतिहास रचला

रविचंद्रन अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

या भारतीय खेळाडूने अचानक जाहीर केली निवृत्ती, 31व्या वर्षी घेतला मोठा निर्णय

IND W vs WI W:पहिल्या T20 मध्ये वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव

मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली, मध्य प्रदेशचा पाच गडी राखून पराभव केला

पुढील लेख
Show comments