Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

IPL 2023 : प्रभसिमरन सिंगचं तडाखेबंद शतक

Delhi Daredevils
Webdunia
शनिवार, 13 मे 2023 (21:41 IST)
social media
आयपीएलच्या 59व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर पंजाब किंग्जचे आव्हान आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने 20 षटकांत सात गडी गमावून 167 धावा केल्या.
 
धावांच्या राशी आणि शतकांचे रतीब यामध्ये प्रभसिमरन सिंग या भारतीय खेळाडूने दमदार भर घातली. पंजाब किंग्जतर्फे खेळणाऱ्या प्रभसिमरन सिंगने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना खणखणीत शतकाची नोंद केली. प्रभसिमरनचं आयपीएल स्पर्धेतलं हे पहिलंच शतक आहे.
 
पंजाब किंग्ज आणि पूर्वीच्या किंग्ज इलेव्हन पंजाबतर्फे शतक झळकावणारा प्रभसिमरन बारावा फलंदाज ठरला आहे. याआधी शॉन मार्श, माहेला जयवर्धने, पॉल वल्थाटी, अडम गिलख्रिस्ट, डेव्हिड मिलर, वीरेंद्र सेहवाग, वृद्धिमान साहा, हशीम अमला, ख्रिस गेल, के.एल.राहुल, मयांक अगरवाल यांनी शतकी खेळी केल्या आहेत.
 
आयपीएल स्पर्धेत शतक झळकावताना भारतासाठी न खेळलेल्या मोजक्या खेळाडूंमध्येही प्रभसिमनरचा समावेश झाला आहे. मनीष पांडे, पॉल वल्थाटी, देवदत्त पड्डीकल, रजत पाटीदार, यशस्वी जैस्वाल या यादीत आता प्रभसिमरने स्थान पटकावलं आहे.
 
प्रभसिमरनचं हे स्पर्धेतलं पाचवं वर्ष आहे. सगळी वर्ष प्रभसिमरन पंजाब किंग्ज संघाचाच भाग आहे.
पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रभसिमरन सिंगने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. त्याने 18व्या षटकातील चौथ्या चेंडूवर खलील अहमदला चौकार मारून शतक पूर्ण केले. आयपीएलच्या चालू मोसमात शतक झळकावणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे.
 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

विराट कोहलीने शिखर धवनचा विक्रम मोडला

GT vs MI :आजचा सामना कोण जिंकणार, गुजरात की मुंबई

CSK vs RCB: RCB ने घरच्या मैदानावर CSK चा पराभव केला

CSK vs RCB Playing 11: आरसीबी सीएसकेला पराभूत करण्याचा प्रयत्न करेल, प्लेइंग 11 जाणून घ्या

SRH vs LSG : लखनौने हैदराबादला पाच विकेट्सने हरवले,सामना 5 गडी राखून जिंकला

पुढील लेख
Show comments