Dharma Sangrah

पुणे : अ‍ॅमेझॉनला 51 लाखांचा गंडा

Webdunia
सोमवार, 22 जानेवारी 2018 (08:57 IST)

पुण्यात तत्काळ डिलिव्हरीसाठी अ‍ॅमेझॉन कंपनीने विमानाने मागविलेल्या 51 लाख रुपये किमतीचे मोबाईल व इतर महागड्या वस्तू मध्येच अज्ञात व्यक्तीने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमेझॉनचे सिक्युरिटी प्रिव्हेन्शन मॅनेजर प्रणव गोपाळ बोराळे (33, रा. कलम ग्रीन लीफ, किरकीटवाडी) यांनी तक्रार दिली आहे. 

अमेझॉन कंपनीकडे तत्काळ डिलिव्हरीची मागणी झाल्यानंतर संबंधित उत्पादने विमानाने मागविली जातात. ज्या शहरातून पार्सल येणार आहे त्या ठिकाणच्या विमानतळावर सुरक्षेच्या कारणास्तव अमेझॉनची पार्सल फोडून त्यात काय आहे, हे तपासले जाते. त्यानंतर पार्सल पुन्हा पॅक करून पाठविले जाते. सुरक्षेच्या कारणास्तव नाकारलेले पार्सल रस्तामार्गे पाठविले जाते. त्यामुळे विमानतळावर प्रत्यक्ष किती आले याची पाहणी केली जाते. अमेझॉन कंपनीने काही वस्तू पार्सल पाठविले होते. लोहगाव विमानतळावर यातील काही पार्सल कमी असल्याचे आढळून आल्यानंतर चौकशी केली गेली. यात  गेल्या सहा महिन्यांत गहाळ असलेल्या वस्तूंची चौकशी केली. त्या वेळी वस्तू मध्येच कोणीतरी काढून घेतल्या असल्याचे समोर आले. पाच एप्रिल ते 29 नोव्हेंबरदरम्यान 232 मोबाईल, इतर वस्तू असा 51 लाख 11 हजार रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या असल्याचे समोर आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मारुती सुझुकी या वर्षी ३ गाड्या लाँच करणार: कोणते मॉडेल्स येत आहेत ते जाणून घ्या

LIVE: NCRB अहवाल २०२४: महाराष्ट्रात मुलांवरील अत्याचारांचे प्रमाण सर्वाधिक

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात: ५० पैसे किलोपर्यंत भाव घसरले, १५०० रुपये अनुदानाची मागणी

भीमाशंकर मंदिराचे दरवाजे ३१ मे रोजी पुन्हा उघडणार; व्यवसायात वाढ अपेक्षित, तरीही हॉटेल मालक संकटात

फेक न्यूज पसरवणाऱ्यांना आता चाप! महाराष्ट्र सरकार आणतंय नवा कठोर कायदा

पुढील लेख
Show comments