rashifal-2026

Whatsapp स्टेटस'मध्ये होणार हा नवा बदल

Webdunia
गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (15:09 IST)
Whatsapp ने नवीन अँड्रॉईड बीटा अपडेट जारी केली आहे, ज्यात डिझाईनमध्ये काही बदल दिसून येत आहेत. शिवाय एक बगही दुरुस्त केला आहे. नवीन अपडेट बीटा व्हर्जनच्या 2.19.328 मध्ये देण्यात आली आहे. लवकरच सर्व युझर्सना ही अपडेट मिळणार आहे. काही वृत्तांनुसार, Whatsapp चा कॅमेरा आयकॉनही बदलणार आहे, जो आतापर्यंत इंस्टाग्रामच्या लोगोसारखा दिसत होता.
 
Whatsapp चे मेसेज काही काळासाठी गायब करता येणार 
 
WBetainfo च्या रिपोर्टनुसार, Whatsapp चा नवीन कॅमेरा आयकॉन स्टेटस टॅबमध्ये पाहिला जाऊ शकतो. याशिवाय चॅट बारमध्येही कॅमेरा आयकॉन बदलणार आहे. हा कॅमेरा आयकॉन अगोदर इंस्टाग्रामसारखाच दिसत होता. पण हा आयकॉन नव्या रुपात आता कॅमेर्‍यासारखा दिसणार आहे. 
 
याशिवाय बीटा अपडेटमध्येही एक बग फिक्स करण्यात आला आहे. व्हॉईस मेसेज ऐकताना कधी-कधी हा मेसेज या बगमुळे अचानक बंद होत होता. सर्वच युझर्सना ही समस्या सतावत नसली तरी हा बग मात्र Whatsapp ने आता दूर केला आहे.
 
यापूर्वी Whatsapp ने डार्क मोड आणि पहिल्यापेक्षा जास्त Group invite यांसारखे फीचर्स जारी केले होते. यूजर्सला कोणत्या ग्रुपमध्ये कुणी dd करावं याची निवड आता यूजर्सलाच देण्यात आली आहे. यूजर्सना कोणत्याही ग्रुपध्ये dd केलं जात होतं, ज्यामुळे प्रायव्हसीचा धोका तर होताच, मात्र काही आक्षेपार्ह आणि साजात तेढ निर्माण करणार्‍या ग्रुपवर कायदेशीर कारवाईच्या घटनाही घडल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका धर्मशाळेत आमनेसामने येतील

ईव्हीएम सुरक्षेवरून वाद निर्माण; स्ट्राँग रूम परिसरात जॅमर बसवण्याच्या मागणीसाठी उमेदवारांचे उपोषण

महायुती विरुद्ध लोकशाही! संजय राऊत यांचा विरोधी पक्षनेत्यावर हल्ला बोल

मनरेगाचे नाव बदलण्यावरून काँग्रेसची टीका अयोग्य: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: नाशिकमधील गडकरी चौकातील आयजीपी कार्यालयाच्या आवारात बिबट्या घुसला

पुढील लेख
Show comments