Marathi Biodata Maker

मुलीच्या नावे खोटे फेसबुक अकाऊंट लुटले पाच लाखांना

Webdunia
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (09:30 IST)

फेसबुकने जाहीर केले की जगात २० कोटी फेसबुक खाती ही खोटी आहेत. याचीच प्रचीती मुंबई येथे आली आहे. दोघातील  पार्किंगच्या वादातून एकाने मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार केले तर ज्याच्यासोबत वाद झाला त्यला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली होती. मग विश्वास जिंकून त्याला त्यानंतर एका ठिकाणी बोलावून  बेदम मारहाण तर केलीच सोबत  5 लाख रुपये लुटले आहे. ही  घटना चेंबूरमध्ये घडली आहे. चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात राहत असलेल्या हितेंद्र उर्फ बाबू ठाकूर याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्याला ८ जानेवारी रोजी  अनोळख्या मुलीची फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. मुलगी मग नाही कोण म्हणतय मग काय त्याने  स्वीकारली . मग  दोघांचेही फेसबुक मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. त्यात त्या मुलीने त्याला  गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते. मुलगी बोलावतेय हे पाहून  ठाकूरही तेथे वेळेत हजर झाला. त्याला इथे एक लांबून मुलीने हात दाखवून त्याला जवळ बोलावल होते . त्याला वाटले की  तीच मुलगी आहे,  तो जवळ गेला. तेव्हा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला लोखंडी रॉड आणि स्टंपने चोप त्याला चांगलाच दिला आहे. तर त्याच्याकडील ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.  घटनेची माहिती मिळताच च देवनार पोलिसांनी ठाकूरच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यावरून पोलिसानी 3 जणांना अटक केली. इतर आरोपी फरार आहे. अतर्गत वादातून हे प्रकरण घडले होते. तेव्हा कोणी फेसबुकवर अनोळखी असेल तर दोनदा विचार करा.

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

अमरावती निवडणुकीत भाजपच्या पराभवाचे विश्लेषण केले जाईल-चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: लाडकी बहीण योजनेसाठी आता आधार प्रमाणीकरण अनिवार्य

घराबाहेर उन्हामध्ये बसलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना कारने चिरडले

लाडकी बहीण योजनेतील महिला हप्त्यांच्या प्रतीक्षेत, बुलढाणा जिल्ह्यातील महिलांनी निषेध केला

दिवसाढवळ्या आरडी एजंटची निर्घृण हत्या; गडचिरोली मधील घटना

पुढील लेख
Show comments