Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गूगलने क्युआर कोड स्कॅनशी संबंधित अ‍ॅप्स काढून टाकली

Webdunia
शुक्रवार, 30 मार्च 2018 (10:45 IST)
गूगलने अलिकडेच काही अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकली आहेत. विशेष म्हणजे काढून टाकलेली अ‍ॅप्स ही क्युआर कोड स्कॅनशी संबंधित आहेत.  क्यू आर कोड फ्री स्कॅन, क्यु आर कोड स्कॅनर प्रो, क्यु आर कोड स्कॅन बेस्ट, क्युआर कोड / बार कोड फ्री स्कॅन, क्युआर अँड बारकोड स्कॅनर, स्मार्ट कॉम्पास, स्मार्ट क्युआर स्कॅनर अँड जनरेटर ही अ‍ॅप्स गूगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकली आहेत. 

मालवेअरमुळे मोबाईलला होणारी समस्या आपल्यासाठी नवी नाही. मालवेअरचा प्रवेश झाल्यामुळे मोबाईलची सिस्टीम ढासळून पडते. अलिकडेच, नव्या मालवेअरने मोबाईलधारकांना प्रचंड त्रास दिला होता. सोफोलॅब्जने यामागचे कारण असणारे हिडन अ‍ॅड एजे मालवेअर शोधून काढले आहे. काही अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यानंतर काही वेळातच मोबाईलधारकावर जाहिरातींचा भडिमार करतात. 

या जाहिराती धोकादायक असतात. सोफोलॅब्जच्या म्हणण्यानुसार ही मालवेअर्स जाहिराती आणि वेब पेजीस पॉप अप करतात. यात क्‍लिकेबल लिंकचाही समावेश असतो. त्यामुळे वाईट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी जाहिरातींचा महसूल मिळतो. सोफोलॅब्जने अशा अ‍ॅप्सची माहिती गूगलला दिली होती. त्यानंतर सात अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकण्याचा निर्णय गूगलने घेतला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

महाकुंभ : प्रचंड गर्दीमुळे संगम रेल्वे स्टेशन २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्याची चाकूने वार करून हत्या, तीन संशयित ताब्यात

LIVE: मला फक्त दोन तासांसाठी ईडीची कमान द्या,संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

लातूर मध्ये वेगवान एसयूव्ही हॉटेलात शिरली, एकाचा मृत्यू, चार जखमी

बेकायदेशीर कोळसा खाण कोसळल्याने पती-पत्नीचा वेदनादायक मृत्यू

पुढील लेख
Show comments