suvichar

Google Play Store मधून काढून टाकल्यानंतर आता Paytm एप मोबाईल फोनमध्ये बंद होईल का?

Webdunia
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (15:38 IST)
लोकप्रिय मोबाइल पेमेंट अॅप पेटीएम Google Play Store वरून काढण्यात आला आहे. यानंतर वापरकर्ते हे एप डाउनलोड करण्यास सक्षम नाहीत. पण पेटीएम शोधल्यानंतर कंपनीच्या अन्य अ‍ॅप्स Paytm for business, Paytm money, Paytm Mall अजूनही प्ले स्टोअरवर उपस्थित आहेत. याशिवाय आम्ही Apple App Store वर हे तपासले, त्यानंतर हा एप तेथे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. आता प्रश्न पडतो की वापरकर्ते आता ते वापरण्यास सक्षम होणार नाहीत का? 
 
पेटीएम केवळ Google Play Store वरून काढले गेले आहे, परंतु आपण आयफोन वापरकर्ते असल्यास एप स्टोअर हे एप आता उपलब्ध आहे. परंतु जर पेटीएम आपल्या फोनमध्ये आधीपासून अस्तित्वात असेल तर आपण तरीही तो वापरू शकता. 
 
महत्त्वाचे म्हणजे की या अ‍ॅपच्या मदतीने केवळ रिचार्ज केले जात नाही, तर या एपचा वापर लहान ते मोठमोठ्या पेमेंट्सपर्यंत खरेदी आणि गुंतवणुकीपर्यंत सर्व काही करण्यासाठी केला जातो.
 
गूगलने म्हटले आहे की, प्ले स्टोअरवर भारतात ऑनलाईन कॅसिनो आणि स्पोर्ट्स सट्टेबाजीच्या अ‍ॅप्सना परवानगी नाही. या संदर्भात, पेटीएम सतत प्ले स्टोअरच्या नियमांचे उल्लंघन करीत आहे. विशेष म्हणजे की पेटीएम ही भारतातील सर्वात मूल्यवान स्टार्टअप आहे आणि असा दावा करतो की यात 5 कोटी मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. एकमेकांशी पैशाच्या ट्रांसफरची सुविधा देणारे पेटीएम एप आज प्ले स्टोअर वरून काढण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ५ लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने महसूल सहायकाला अटक केली

LIVE: महाराष्ट्र इयत्ता १०वी आणि १२वी बोर्ड परीक्षेच्या निकालांबाबत एक मोठे अपडेट समोर आले

DC vs PBKS: पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ऐतिहासिक विजय नोंदवला

मुंबईतील मेट्रो लाईन ६ च्या कामामुळे २५-२६ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेवर रात्रीच्या वेळी वाहतूक बंद राहणार

पुढील लेख
Show comments