Marathi Biodata Maker

जीओची पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर

Webdunia
शनिवार, 17 मार्च 2018 (17:01 IST)

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ८ महिन्यांपर्यंत दररोज 1.5GB डेटा फ्री मिळेल. पण ही ऑफर फक्त जिओ फायच्या युजर्ससाठी आहे. १९९९ रुपयांना खरेदी केलेल्या जिओफायमध्ये आता ३५९५ रुपयांचा फायदा मिळेल. त्याचबरोबर १२९५ रुपयांचा डेटा मिळेल. याअंतर्गत युजर्स 1.5 जीबी, 2 जीबी आणि 3 जीबी डेटा असलेले प्लॅन्स वापरू शकता.

रिलायन्स जिओ १९९९ रुपयांच्या जिओफायमध्ये मोफत डेटा आणि जिओ व्हाऊचर देईल. या ऑफरमध्ये ग्राहकांना एकूण ३५९५ रुपयांचा फायदा मिळेल. या ऑफरमध्ये कंपनी ९९९ रुपयांचा जिओफाय १९९९ रुपायांना देईल. ज्यात १२९५ रुपयांचा बंडल्ड डेटा आणि २३०० रुपयांचे जिओ व्हाऊचर मिळेल. 


JioFi खरेदी केल्यावर २३०० रुपये किंमतीचे जिओ व्हाऊचर्स मिळतील. या व्हाऊचर्सचा वापर तुम्ही Paytm, AJio आणि रिलायन्स डिजिटलमध्ये केला जाईल. तसंच रिलायन्स रिटेल स्टोरवर या ऑफरचा फायदा घेता येईल. जिओच्या वेबसाईटवरही हा फायदा मिळेल. या सर्व ऑफर्ससोबत युजर्स प्राईम मेंबरशिप घेऊ शकतात. 

 

या ऑफरअंतर्गत मिळणाऱ्या व्हाऊचर्समध्ये ८०० रुपयांचे कॅशबॅक व्हाऊचर्स असतील. हे तुम्ही फ्लाईट बुकींगसाठी वापरु शकता. याशिवाय AJio वरुन १५०० रुपयांच्या शॉपिंगवर ५०० रुपयांची सूट मिळेल. तर १००० रुपयांच्या व्हाऊचरचा वापर तुम्ही रिलायन्स डिजिटल स्टोरमध्येही करु शकता. सर्व व्हाऊचर्स माय जिओअॅपवर मिळतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

BCCI ने घेतला मोठा निर्णय: मुस्तफिजुर रहमान IPL मधून बाहेर, केकेआर बदली खेळाडू शोधणार

मार्चमध्ये ५०० रुपयांच्या नोटा बंद होणार का? पीआयबीने सत्य उघड केले

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

मुंबईत प्रेयसीने प्रियकराच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केला

नितीन गडकरींनी सासरचे घर पाडले, पत्नीचा धक्कादायक खुलासा

पुढील लेख
Show comments