Festival Posters

नोटीफिकेशन्स पाहा डेस्कटॉपवर

Webdunia
रविवार, 23 सप्टेंबर 2018 (00:30 IST)
व्हॉट्‌सअ‍ॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. मात्र, इतर मॅसेज, अ‍ॅपची नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी फोनवर वारंवार जावेच लागत होते. आम्ही तुम्हाला अशा अ‍ॅपबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या फोनवर आलेले मॅसेज, नोटिफिकेशन तुम्हाला डेस्कटॉपवर देते. पुश बुलेट असे या अ‍ॅपचे नाव असून ते अवघ्या 3.5 एमबीचे आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर आणखी एक सेटिंग डेस्कटॉपवर करावी लागणार आहे. पुश बुलेट अ‍ॅप डाऊनलोड केले की त्यावर फेसबुक किंवा गुगल अकाउंटद्वारे जोडण्यासाठी विचारले जाते. तेथे लॉग इन केल्यावर डेस्कटॉपवर जाऊन तेथील ब्राऊजरवर पुश बुलेटचे एक्सटेंशन अ‍ॅड करावे लागणार आहे. यानंतर या एक्टेंशनमध्ये जे मोबाइलच्या अ‍ॅपमध्ये लॉगिन आहे त्या अकाउंटसारखेच लॉगइन करावे लागणार आहे. या अकाऊंटध्ये लॉग इन केल्यानंतर ब्राऊजरवर उजव्या कोपर्‍यामध्ये एक बुलेटच्या आकाराचा सिम्बॉल दिसतो. यावर तुम्हाला आलेली नोटीफिकेशन समजतात. तसेच एखादा मॅसेज आला तर त्याला रिप्लाय देण्यासाठी नवी छोटी चॅट विंडोही उघडते.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे स्थानकात प्रवेश करताना सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रुळावरून घसरला

दक्षिण सूडान मध्ये विमान कोसळले, १४ जणांचा मृत्यू

अकोला: कार अपघातात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू, गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

पुणे स्थानकावर सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेसचे डबा रुळावरून घसरला

उकाड्यात दिलासा मिळण्यासाठी दुकानदाराने भटक्या कुत्र्यांसाठी दुकानाचे दरवाजे उघडले; व्हिडिओ व्हायरल

पुढील लेख
Show comments