Marathi Biodata Maker

ट्विटरच्या सहसंस्थापकाचे ट्विटर अकाऊंट हॅक

Webdunia
सोमवार, 2 सप्टेंबर 2019 (09:28 IST)
ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी  यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर अनेक वर्णभेदी ट्विट  करण्यात आले. Chuckling Squad या ग्रुपने हे अकाऊंट हॅक केल्याचा दावा केला आहे. 
 
रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी जॅक डॉर्सी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यानंतर जवळपास 15 मिनीटे त्यांच्या ट्विटरवरुन वर्णभेदी, धमकी आणि जबरदस्ती अशाप्रकारचे ट्विट करण्यात आले. याशिवाय ट्विटरच्या मुख्यालयात बॉम्ब असल्याचे खोटं वृत्त त्यांनी ट्विट केलं. अअशाप्रकारच्या आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्यांनी N हे इंग्रजी लेटर आणि होलोकॉस्ट  टाकले होते. यानंतर काही वेळाने हे आक्षेपार्ह ट्विट डिलीट करण्यात आले.
 
विशेष म्हणजे ट्विटरच्या कम्युनिकेशन टीमने जॅक डॉर्सी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. आम्ही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहोत असेही त्यांनी सांगितले.जॅक डॉर्सी यांचे ट्विटरवर 40 लाखाहून जास्त फॉलोअर्स आहे. Chuckling Squad या हॅकिंग ग्रुपने आतापर्यंत अभिनेत्यांसह अनेक कलाकारांचे ट्विटर अकाऊंट हॅक केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले! महाराष्ट्रातील १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

शनी अमावस्येच्या पूजेसाठी गेलेल्या दोन मित्रांचा गूढ मृत्यू; धुळ्यात भोंदूबाबाने घेतला दोघांचा बळी

कोण आहेत RCC क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर सर ? NEET पेपरफुटी प्रकरणाच्या संदर्भात CBI च्या ताब्यात, चौकशी सुरु

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय: शाळांचे हस्तांतरण यापुढे मनमानीपणे करता येणार नाही

पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर अमृता फडणवीस यांनी नाकारले 'कान्स' महोत्सवाचे निमंत्रण

पुढील लेख
Show comments