Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ChatGPT म्हणजे काय आणि त्याची जगभरात ‘भीती’ का निर्माण झालीय?

Webdunia
गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023 (08:43 IST)
कतारमध्ये 30 नोव्हेंबर 2022 रोजी फुटबॉलच्या अंतिम सामन्याची रंगत वाढत चालली होती, त्याचवेळी तंत्रज्ञान जगत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात एका क्रांतिकारी पाऊल टाकत होतं. ते पाऊल म्हणजे – ChatGPT. 
 
ही नवी प्रणाली लिखित मजकूर निर्माण करू शकते आणि तीही अत्यंत सुसंगत. मजकूर वाचून कुणा माणसानेच ते लिहिलंय की काय, असा प्रश्न पडावा, इतकं नेमकं आणि अचूक. 
 
या नवीन प्रणालीत अद्याप त्रुटी आणि उणिवा आहेत. मात्र, तरीही या प्रणालीने जगभरात कुतुहलमिश्रित उत्सुकता निर्माण केलीय आणि त्याचवेळी भीतीही. 
 
अनेकजण तर ChatGPT ला ‘थ्रेट’ म्हणजे ‘धमकी’ शब्दाशी जोडत आहेत.
 
न्यूयॉर्क टाईम्सच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे, सर्जनशीलता, शिक्षण, कार्य, डिजिटल सिक्युरिटी आणि लोकशाही इत्यादी क्षेत्रात या नव्या प्रणालीमुळे मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. 
 
लेखकांच्या मते, एकेकाळी एखादी व्यक्ती जे मत व्यक्त करत होती, ती आता कृत्रिमरित्या वाद निर्माण करणारा रोबोट असू शकते.
 
ChatGPT प्रणाली नेमकी काय आहे?
ChatGPT हा मुळात व्हर्च्युअल रोबोट (चॅटबॉट) आहे, जो विविध प्रश्नांची उत्तरे देतो, लिहिण्याचं काम करतो, अस्खलितपणे संभाषण करतो आणि वैयक्तिक समस्यांवर सल्ला देखील देतो.
 
उदाहरणार्थ, तो तुम्हाला ‘स्ट्रोगॅनॉफ’ कसा तयार करायचा हे शिकवू शकतो. तसंच, तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी, कविता लिहिण्यासाठी, शैक्षणिक पेपर्स लिहिण्यासाठी सल्ला देऊ शकतो. अगदी तुमच्यापासून दूर गेलेल्या मित्राला पत्र लिहिण्याचाही सल्ला देऊ शकतो.
 
SEO.ai च्या चाचण्यांनुसार, ChatGPT जवळजवळ 100 भाषांमध्ये उपलब्ध आहे. परंतु, या मॉडेलचं कार्यप्रदर्शन भाषेनुसार बदलतं. इंग्रजीत सर्वोत्तम काम करतं, असं आतापर्यंत तरी दिसून आलंय.
 
सॅम ऑल्टमन आणि इलॉन मस्क यांनी 2015 साली स्थापन केलेल्या OpenAI कंपनीने ChatGPT विकसित केलंय.
 
मात्र, 2018 साली इलॉन मस्क यांनी ‘टेस्ला’सोबत हितसंबंधांच्या संघर्षाचं कारण देत या कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सॅम ऑल्टमन हेच आता या कंपनीचे प्रमुख आहेत.
 
ChatGPT लॉन्च झाल्याच्या पाच दिवसातच कोट्यवधी युजर्सपर्यंत पोहोचलं.
 
OpenAI कंपनीच्या म्हणण्यानुसार, “चाचणी आणि संशोधनाच्या टप्प्यातला वापर सर्वांसाठी विनामूल्य आणि खुला असेल. 
 
कंपनीने इशारा दिलाय की, ChatGPT अधूनमधून चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहितीही निर्माण करू शकते. कारण तिच्या डेटाचा इतिहास 2021 पर्यंत मर्यादित आहे. 
 
ही नवी प्रणाली गूगलच्या वर्चस्वला थेट धोका निर्माण करतेय. मात्र, ही प्रणाली अद्याप काही गंभीर चुका करतेय, हेही लक्षात घेतलं पाहिजे.
 
जसं की, ChatGPT नुसार ब्राझीलनं आतापर्यंत पाच ऑस्कर जिंकलेत. वास्तवात एकही जिंकलं नाहीय.
 
कृत्रिम बुद्धिमतेच्या क्षेत्रात ChatGPT क्रांतिकारी का मानलं जातंय?
सर्वोत्तम मजकुरावर आधारित AI प्रोग्राम्स प्रचंड प्रमाणात डेटा संचयित करून, मग अल्गोरिदमचा वापर करत वाक्याच्या सर्वोत्तम सूत्रीकरणाचा अंदाज लावतो. याला लार्ज लँग्वेज मॉडेल्स (LLMs) म्हणतात.
 
न्युरोसायन्सटिस्ट आणि युनिफेस्पचे प्राध्यापक अल्वारो मचाडो डायस म्हणतात की, सॉफ्टवेअर प्रशिक्षणादरम्यान चॅटबॉटला प्रश्न विचारले जातात आणि तो त्याची विस्तृत उत्तरं देतो.
 
“चॅटबॉटचा प्रतिसाद चुकीचा असल्यास योग्य उत्तर सिस्टिममध्ये टाकलं जातं आणि पुढच्या वेळेस ते योग्य उत्तर देतं.” 
 
ChatGPT जवळजवळ माणसासारखाच बोलायला शिकला आहे. 
 
मचाडो डायस म्हणतात की, या प्रणालीचं वेगळेपण म्हणजे भाषा कशी काम करते, ही तांत्रिक बाजू समजून काम करणं. मानवी प्रतिसादाच्या माध्यमातून (RLHF) ही प्रणाली शिकते.
 
इंजिनिअर्स या प्रणालीला शिकवण्यासाठी ‘परतावा’ आणि ‘शिक्षण’ अशा पद्धती वापरतात. यातून परस्परसंवाद उत्तमपणे पाहायला मिळतो. ही एक उत्तम ‘ट्युनिंग’ प्रक्रिया आहे.
 
“वास्तवात, इंजिनिअर्स अल्गोरिदमद्वारे दिलेल्या प्रतिसादांना त्यांच्या प्रासंगिकतेनुसार प्राधान्यक्रम निश्चित करतात आणि मजकुराच्या आऊटपुटची प्रासंगिकता वाढवण्यासाठी निश्चित केलेली प्राधान्ये जाणून घेण्यासाठी प्रोग्रामला प्रोत्साहित करतात,” असं युनिफेस्पचे प्राध्यापक म्हणतात.
 
ChatGPT ला चुका मान्य करणे, चुकीच्या गृहितकांना आव्हान देणे आणि अयोग्य विनंत्या नाकारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
पण कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या एका प्रोफेसरने प्रोग्रामिंग कोड लिहिण्यासाठी सिस्टीम मिळवली की फक्त गोरे किंवा आशियाई पुरुष चांगले शास्त्रज्ञ बनवतात. 
 
OpenAI म्हणते की, सर्व प्रयत्न केले असले तरी कधी कधी ही प्रणाली अडचणीच्या ठरणाऱ्या सूचनाही देऊ शकते. मात्र, प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी चाचणी टप्प्यात गोळा केलेला डेटा वापरला जाईल.
 
शिक्षण आणि सर्जनशीलतेसाठी ChatGPT धोकादायक आहे का?
हा बदल रोजगारावर टांगती तलवारीसारखा आहे. पत्रकारितेसारख्या माहितीवर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रात मोठे बदल होऊ शकतात. या क्षेत्रातील नोकऱ्यांवर थेट गदा येऊ शकते. 
 
कोड जनरेशनमध्ये ChatGPT ची स्पर्धा तुलनेने प्रोग्रामिंगासारख्या नवीन क्षेत्रात प्रश्न निर्माण करत आहे. परंतु, ChatGPT च्या संभाव्य समस्या लक्षात घेतलेल्या क्षेत्रांपैकी एक म्हणजे नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे सर्वात जास्त धोका निर्माण झालेलं क्षेत्र म्हणजे शिक्षण. 
 
विद्यार्थी असाईनमेंट तयार करण्यासाठी या प्रणालीचा वापर करू शकतात. त्यामुळे ChatGPT लॉन्च झाल्याच्या महिन्याभरातच अमेरिकेतील काही शहरांनी या प्रणालीवर बंदी आणली.
 
ChatGPT वरून आलेली सामग्री ओळखण्यासाठी OpenAI एका प्रकारच्या फ्लॅगवर काम करत आहे. चॅटबॉटने मजकूर तयार केल्याची शक्यता अगदी अचूकपणे ओळखणारे अल्गोरिदम आधीच आहेत.
 
या प्रणालीमुळे मानवी शिक्षणावर संरचनात्मक परिणाम होण्याची भीती आहे. उदाहरणार्थ, निबंध लिहिताना सर्जनशीलतेचा वापर करून लिहिला जातो. मात्र, या प्रणालीमुळे परिणाम होऊ शकतो.
 
युनिफेस्पचे मचाडो डायस म्हणतात, “मला विचारांच्या ‘अल्गोरिदम’करणाबद्दल खूप काळजी वाटते, जी AI सह परस्परसंवादामुळे आपल्या समज आणि जगाशी असलेल्या नातेसंबंधात बदल घडवेल.” 
 
“मला वाटते की, आधुनिक इतिहासातील ही सर्वांत मोठी मानसिक बदल असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हजारो वर्षांपासून तांत्रिक विकासाचा परिणाम म्हणून मानवी मेंदूचा आकार हळूहळू कमी होत आहे.” 
 
‘आर्टिफिशियल इंटेलिजियन्स : फ्रॉम झिरो टू मेटाव्हर्स’ या पुस्तकाचे लेखक मार्था गॅब्रिएल म्हणतात की, नवीन काळाशी जुळवून घेणे आवश्यक आहे.
 
“तुम्हाला प्रश्नांसंदर्भात विचार करावा लागणार आहे. कसं विचारायचं, हे समजायला हवं आणि कसं विचारायचं, यासाठी तुम्हाला चिकित्सात्मक विचार करावा लागेल,” असं ते म्हणतात. 
 
दुसरी थीम मानवी सर्जनशीलतेचं भविष्य आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नसलेल्या सामग्रीच्या निर्मितीभोवती फिरते. 
 
OpenAI प्रणालीच्या लॉन्चिंगनंतर अवघ्या दहा दिवसांनंतर सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) मधील एका डिझायनरने आठवड्याभरात ChatGPT आणि MidJourney च्या मदतीने लहान मुलांसाठी असं पुस्तक बनवलं, ज्यात चित्र आणि माहिती मिळते. 
 
“अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे लेखन-चोरीचा मुद्दा. ChatGPT सारख्या मॉडेल्सचे प्रशिक्षण इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या बातम्या, पुस्तके आणि ब्लॉग यांसारख्या मजकुरावर आधारित असल्याने, त्यांची उत्तरे काही विशिष्ट लोकांकडून श्रेय न घेता प्रकाशित करू शकतात,” असं रिओ दी जेनेरियास्थित संशोधक युरी लिमा म्हणतात. 
 
त्या पुढे म्हणतात की, “सर्जनशील क्षेत्रांमध्ये लेखकांची ओळख महत्त्वाची मानली जाते. शिवाय, स्त्रोत माहित नसल्यामुळे खोट्या बातम्यांप्रमाणे पूर्वाग्रह किंवा खोटेपणा ओळखणे कठीण होते.” 
 
मचाडो डायस यांनी नमूद केले आहे की, “सर्जनशीलता असामान्य आणि संबंधित अशा दोन्ही प्रकारच्या संयोगांमधून उद्भवते. अल्गोरिदम हे संयोजन निर्माण करण्यासाठी उपकरणासारखं असल्याने सर्जनशील प्रेरणा कमी होण्याची शक्यता आहे.” 
 
“दुसरीकडे, अल्गोरिदम त्यांची कार्ये करत असताना, ते असे नमुने तयार करतात, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आपली एकत्रित समज, म्हणजेच आमची सर्जनशीलता वाढवते.” 
 
मार्था गेब्रियल हेही याच्याशी सहमत होत म्हणतात की, “आपल्या विचाराचा विस्तार करण्यासाठी तंत्रज्ञान हे एक अतुलनीय साधन असू शकते.” 
 
“नैतिकता आणि नैतिकतेवर टीका न करता किंवा प्रश्न न करता, या प्रणालींचा आंधळेपणाने वापर करणार्‍यांसाठी हा एक मोठा धोका असू शकतो. हा केवळ वैयक्तिक धोका नाही तर संपूर्ण मानवतेसाठी आहे.”

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments