Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एका महिन्यात 71 लाख WhatsApp अकाउंट्सवर बंदी, तुम्हीही करत आहात का या चुका?

Webdunia
मंगळवार, 2 जानेवारी 2024 (13:32 IST)
WhatsApp Ban Accounts in India 2023 मध्ये ऑनलाइन Scam प्रकरण खूप चर्चेत राहीले. यापैकी सर्वात जास्त प्रकरणांमध्ये स्कॅमर्सने व्हाट्सअॅप वापरुन लोकांना टार्गेट केले. या ऑनलाइन घोटाळ्यांची प्रकरणे इतकी टोकाला पोहोचली की भारत सरकारलाही हस्तक्षेप करावा लागला आणि कंपनीला कारवाई करण्यास सांगण्यात आले, त्यानंतर व्हॉट्सअॅपने मोठी कारवाई केली आणि महिन्यात भारतातील एकूण 71 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घातली. 
 
Accounts रेकॉर्डब्रेक बंदी
नवीन IT नियम 2021 चे पालन करताना, WhatsApp ने उघड केले की त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये भारतात रेकॉर्डब्रेक 71 लाख संशयास्पद खात्यांवर बंदी घातली आहे, असे IANS अहवालात म्हटले आहे. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत, कंपनीने वापरकर्त्यांच्या अहवालानंतर एकूण 19,54,000 खाती बंद केली आहेत. कंपनीने मासिक अहवालात ही माहिती दिली आहे.
 
कंपनीने एवढी मोठी कारवाई का केली, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर जाणून घ्या की अनेकदा आपल्यापैकी अनेकजण जाणूनबुजून किंवा नकळत अशा चुका करतात ज्यामुळे खाते बॅन केले जाते. तुम्हीही या चुका करत तर नाहीये? त्याबद्दल लगेच जाणून घ्या...
 
WhatsApp अकाउंट्स बंदीचे कारण
Unofficial व्हर्जन असणार्‍या WhatsApp चा वापर
जर तुम्हाला वाटत असेल की व्हाट्सअॅपच्या Unofficial Version वापरणे योग्य आहे तर जाणून घ्या की अशाने तुम्ही एकेदिवशी या प्लेटफार्मवरून बॅन होणारच आणि सोबतच तुम्हीही मोठ्या संकटात सापडू शकता. तुम्ही कदाचित यापैकी काही बद्दल ऐकले असेल, जसे की GB WhatsApp, WhatsApp Plus, WhatsApp Go, WhatsApp Prime आणि OG WhatsApp, असे अॅप्स चुकूनही वापरू नका.
 
धमकी देणारी आणि बेकायदेशीर सामग्री पाठवणे
अनधिकृत व्हॉट्सअॅप व्हर्जन व्यतिरिक्त, तुम्ही व्हॉट्सअॅपवर बेकायदेशीर सामग्री शेअर केल्यास, लोकांना धमकावत असल्यास आणि आक्षेपार्ह मजकूर पाठविल्यास, तुमच्यावर प्लॅटफॉर्मद्वारे बंदी घातली जाऊ शकते. व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्येही ही माहिती देण्यात आली आहे.
 
सतत रिपोर्टिंग
जेव्हा जेव्हा एखादा वापरकर्ता तुम्हाला ब्लॉक करतो, तेव्हा तो तुमच्या व्हॉट्सअॅप खात्याची तक्रार देखील करू शकतो आणि सतत रिपोर्टिंगमुळे तुमचे खाते बॅन देखील केले जाऊ शकते. त्यामुळे अशा चुका कधीही करू नका ज्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होऊन तुमची तक्रार करेल.

संबंधित माहिती

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

पुढील लेख
Show comments