Dharma Sangrah

गप्पा मारण्यासाठी व्हॉटस् अ‍ॅपचे शानदार फिचर

Webdunia
गुरूवार, 9 एप्रिल 2020 (22:17 IST)
लॉकडाऊनमध्ये गप्पा मारण्यासाठी  व्हॉटस् अ‍ॅपने एक शानदार फिचर आणले आहे. आता आपण घरबसल्याच एकाच नव्हे तर अनेक लोकांशी एकाचवेळी गप्पागोष्टी करू शकता. केवळ गप्पांसाठीच नव्हे तर ऑफिसचे व्हिडीओ कॉलही या माध्यमातून करता येतील. 
 
फेसबुकच्या अंतर्गत काम करणार्‍या ‘व्हॉटस् अ‍ॅप’ने घोषणा केली आहे की आता कोणताही यूजर आपल्या एखाद्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपमधील लोकांशी व्हिडीओ चॅट करू शकतो. अर्थात एकावेळी केवळ चारजणच स्क्रीनवर दिसू शकतात; पण हा व्हिडीओ चॅट संपूर्ण ग्रुप ऐकू शकेल. याबाबत कंपनीने एक ट्विटही केले आहे. कंपनीने म्हटले आहे की आपण आपल्या कोणत्याही व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपमध्ये जाऊन तेथील व्हिडीओचा आयकॉन प्रेस करा. त्यानंतर ग्रुपच्या सर्व लोकांजवळ नोटिफिकेशन जाईल. त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही तीन सदस्यांना निवडा ज्यांना आपण स्क्रिनवर पाहू इच्छिता. अर्थात त्यावेळी आपले सर्व बोलणे ग्रुपमधील अन्य सदस्यही ऐकू शकतात. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

अशोक खरात वर नाशिक मध्ये १५ वी एफआयआर दाखल

LPG Delivery New Rule: गॅस सिलिंडरसाठी नवा नियम लागू, डीएसी नंबर अनिवार्य असेल

बारामती पोटनिवडणूक २०२६: मी येसुबाईंसारखी लढेन, अहिल्यादेवींसारखं राज्य करेन'; बारामती पोटनिवडणुकीच्या रॅलीत सुनेत्रा पवार भावूक

शरद पवारांचे रुग्णालयातून बारामतीकरांना भावनिक आवाहन

LIVE: शरद पवारांचे रुग्णालयातुन सुनेत्रा पवारांना मत देण्याचे जनतेला आवाहन

पुढील लेख
Show comments