Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

WhatsApp वर येणार लॉगआउट फीचर, इतर नवीन फीचर्स देखील जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (15:09 IST)
WhatsApp पुन्हा नवीन फिचर्स घेऊन येत आहे. पाच नवीन फीचर्ससह यूजर्ससाठी हे अॅप अजून सुरक्षित असल्याचं सांगितलं जातं आहे. 
 
आता व्हॉट्सॲपवर लॉगआउट होण्याचं फीचर उपलब्ध होणार आहे. ज्याने अॅपपासून ब्रेक घेणे सोपे होईल. सध्या विश्रांती घेऊ इच्छित असणार्‍यांना डिलिट हाच पर्याय उपलब्ध आहे. नव्या फीचरमुळे लोक काही दिवसांसाठी व्हॉट्सअपमधून लॉगआउट करू शकतील. व्हॉट्सॲपच्या नव्या बीटा व्हर्जनमध्ये लॉगआउटचा पर्याय देण्यात आला आहे. हे iso आणि अँड्रॉइड या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. 
 
व्हॉट्सॲप मल्टी-डिव्हाइस सपोर्ट फीचरवर पण काम करत आहे ज्याने यूजर्स आपलं व्हॉट्सॲप अकाउंट अनेक डिव्हाइसशी लिंक करु शकतील. एकच अकाउंटने अनेक डिव्हाइसमध्ये एकावेळी व्हॉट्सअॅप वापरता येईल.
 
व्हॉट्सॲप बीटा अपमध्ये मेन्शन बॅज देण्यात आला आहे. ग्रुपमधल्या चर्चांमध्ये तुमच्याबद्दल चर्चा होईल तेव्हा ग्रुप सेलमध्ये एक नवा बॅज अड होईल. 
 
सध्या मोबाईलवरुनच व्हॉट्सॲप कॉल करता येतो. पण webwhatsapp वापरणार्‍यांसाठी लॅपटॉपवरून कॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल वेब व्ह़ॉट्लअपवरून करता येतील. 
 
Read Later या फीचरमुळे चॅटकडे दुर्लक्ष करण्याची सुविधा मिळेल.
 
ग्राहकांची गरज बघून व्हॉट्सअॅपने नवीन फीचर दिले आहेत. WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे झालेल्या वादांमुळे इतर चॅटिंग कंपन्या स्पर्धेत उतरल्यामुळे व्हॉट्सॲप पुन्हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी फीचर्स घेऊन आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

OP Chautala Passes Away हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन

महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यासह 6 जण निलंबित, एफआयआर दाखल,

LIVE: राहुल गांधींना नरेंद्र मोदी घाबरतात- नाना पटोले

नरेंद्र मोदींना राहुल गांधींची भीती वाटते, अमित शहांची पापे लपवण्यासाठी भाजपची ही नवी कृती म्हणाले नाना पटोले

संत गाडगेबाबा पुण्यतिथी : गाडगे महाराजांचे उपदेशात्मक सुविचार

पुढील लेख
Show comments