Marathi Biodata Maker

जागतिक दूरसंचार दिवस

Webdunia
शुक्रवार, 17 मे 2019 (12:24 IST)
प्रत्येक वर्षी 17 मे रोजी, जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. तर आम्ही जाणून घेऊ जागतिक दूरसंचार दिवसाचा इतिहास आणि हा का म्हणून साजरा करण्यात येतो येथे सांगण्यात येत आहे.  
 
संचारच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि जगभरात याचे माहिती वाढवण्यासाठी प्रत्येक वर्षाच्या 17 मे रोजी जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्यात येतो. म्हणून हा दिवस संचारच्या विकासासाठी समर्पित आहे.  
 
टेलिफोनच्या आधी तारेने संदेश दिले जात होते. त्याचा विस्तार करण्यासाठी 17 मे 1865ला इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनची स्थापना झाली. यानिमित्ताने हा दिवस 1973 पासून साजरा होऊ लागला. मात्र 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासून संदेश व संवाद माध्यमांमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. या श्रेणीत मोबाइल, इंटरनेट आले. यामुळे आतापर्यंत 'जागतिक दूरसंचार' नावे साजरा होणारा हा दिन जागतिक दूरसंचार व माहिती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2006 मध्ये घेण्यात आला. तेव्हापासून हा दिन दरवर्षी साजरा होत आहे
 
तसेच हा दिवस या हे ही संकेत देतो की आमच्या जीवनात संचार किती महत्त्वपूर्ण आहे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विकासाला देखील प्रोत्साहित करतो. 
 
दूरसंचार काय आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?  
 
एक संचार जो केबल, टेलीग्राफ किंवा प्रसरण द्वारे दुरून केला जातो त्याला दूरसंचार म्हणतात. दुसर्‍या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर आम्ही म्हणू शकतो की हे सिग्नल, संदेश, शब्द, लेखन, प्रतिमा आणि ध्वनी किंवा कुठल्याही प्रकारच्या माहितीचे संचारणं आहे. तंत्रज्ञानाच्या बगैर संचार सहभागांमध्ये  माहितीचे आदान प्रदान शक्य नाही आहे.  
 
घरगुती लॅण्डलाइनची संख्या झपाट्याने घसरत आहे. मोबाइल येण्याआधी ज्यांच्याकडे लॅण्डलाइन होते, तेच घरगुती फोन सध्या वापरात असल्याचे दिसून येते. इंटरनेट अर्थात ब्रॉडबॅण्ड सेवा ही लॅण्डलाइनशी संलग्न आहे. त्यांच्याकडेच आज लॅण्डलाइन आहेत. मात्र, यामध्ये देखील आता राऊटरचा पर्याय आहे. हे राऊटर वायरसह किंवा वायरविना पुरविणाऱ्यादेखील 15 हून अधिक कंपन्या आहेत. सोबतच विविध मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे हॉटस्पॉट डिव्हाईस आहेत. सीम कार्डवरील इंटरनेट हॉटस्पॉटद्वारे जोडण्याची सेवा उपलब्ध आहे. यामुळेच ब्रॉडबॅण्डसाठी लॅण्डलाइन वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. एकूणच दूरसंचार असे नाव असलेले हे क्षेत्र आज झपाट्याने केवळ भ्रमण संचार होत आहे. येत्या काही वर्षांत सर्वत्र केवळ मोबाइल तंत्रज्ञान असेल, असे चित्र आहे.
 
संचार लॅटिन शब्द communicatio मधून घेण्यात आला आहे. तसं तर संचारामध्ये विभिन्न तंत्रज्ञान सामील आहे, म्हणून बहुसंख्याक रूपात दूरसंचारचा उपयोग केला जातो. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेश संघ T20 World Cup साठी भारतात येणार नाही

सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना 15 व्यांदा तुरुंगातून सोडण्यात येणार, 40 दिवसांचा पॅरोल मंजूर

गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी ठरलं

आमदार संजय मेश्राम यांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, मतदान केंद्रात अडथळा आणल्याचा खटला रद्द

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

पुढील लेख
Show comments