Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Jammu Kashmir :उमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री होतील,फारुख अब्दुल्ला यांची घोषणा

Webdunia
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (18:17 IST)
जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्स आघाडी घेत विजयी झाली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री पदासाठी नियुक्त केले जाणार अशी घोषणा आज श्रीनगर येथे केली. 
जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. 
 
जम्मू-काश्मीरमध्ये 10 वर्षांतील पहिली विधानसभा निवडणूक काँग्रेस-एनसी युती जिंकणार हे स्पष्ट झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, 10 वर्षांनंतर जनतेने आम्हाला जनादेश दिला आहे. 
इथे पोलीस राजवट नाही तर लोकराज्य असेल. निरपराधांना तुरुंगातून सोडवण्याचा प्रयत्न करू, राज्याला मीडिया मुक्त करून हिंदू -मुस्लिममध्ये आपसात विश्वास निर्माण करू. 
फारुख अब्दुल्ला म्हणाले की, "लोकांनी आपला जनादेश दिला आहे. त्यांनी हे सिद्ध केले आहे की 5 ऑगस्ट रोजी घेतलेला निर्णय (कलम 370 रद्द करणे) त्यांना मान्य नाही. 

काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स युती एकूण 90 जागांपैकी 52 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप 27 जागांवर आघाडीवर आहे. ट्रेंडनुसार, मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीला (पीडीपी) फक्त दोन जागा मिळू शकतात. ओमर अब्दुल्ला हे यापूर्वी 2009 ते 2015 पर्यंत मुख्यमंत्री होते. 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

भारताने बांगलादेशचा 3ऱ्या T20 मध्ये 133 धावांनी पराभव केला

ब्राझीलमध्ये विनाशकारी वादळामुळे लाखो लोक बेघर, 7 जणांचा मृत्यू

Baba Siddique: फटाक्यांच्या आवाजाचा फायदा हल्लेखोरांनी घेत बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या

खैबर पख्तुनख्वामध्ये प्रवासी वाहनावर अज्ञात बंदूकधाऱ्यांचा गोळीबार

IND vs BAN: संजू सॅमसनने भारतासाठी T20 मधील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले

पुढील लेख
Show comments