Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Krishna Janmashtami 2023: यशस्वी जीवनासाठी श्रीकृष्णाचे हे पाच गुण अवलंबवा

Webdunia
बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (21:53 IST)
Krishna Janmashtami 2023: धार्मिक मान्यतेनुसार, भगवान श्रीकृष्णाला भगवान विष्णूचा अवतार मानले जाते. कन्हैयाचा जन्म पृथ्वीवर माता देवकी आणि वासुदेव यांच्या वंशात झाला. भक्तांना पापांपासून मुक्त करणे, भक्तांचे रक्षण करणे आणि दुष्टांचा नाश करणे आणि महाभारतातून जीवनाचे धडे देणे या उद्देशाने त्यांचा जन्म झाला.
 
त्यांचे संपूर्ण जीवन मानवजातीसाठी एक धडा होता.  महाभारताच्या वेळी, अर्जुनाचा सारथी बनून, त्याने आपल्याला असत्याच्या आणि पापाविरुद्ध, अगदी आपल्याच लोकांविरुद्ध उभे राहण्यास शिकवले. श्रीकृष्णाच्या जीवनाशी संबंधित अनेक कथा आपल्याला जीवन साधे बनवण्याचा धडा शिकवतात. कृष्णाचे गुण यशाचा मार्ग दाखवतात.
श्रीकृष्णाचे काही गुण अंगीकारून जीवनात यशाचा मार्ग मिळवता येईल. चला तर मग जाणून घेऊ या.
 
साधे जीवन जगणे-
भगवान श्रीकृष्णाच्या अनेक गुणांपैकी एक म्हणजे त्यांची साधी जीवन जगण्याची कला.ते  एका मोठ्या कुटुंबातील होते.  गोकुळचे राजा नंदहे त्यांचे  वडील होते. पणत्यानं याचा  अभिमान नव्हता. ते गायींना चरायला घेऊन जायचे. ते नेहमी साधे जीवन जगले. आपल्या पदाचा कधीही गर्व करू नका असा संदेश त्यांनी आपल्या गुणवत्तेने दिला. सर्वांना समान वागणूक द्या.
 
अडचणीच्या वेळी इतरांना साथ देणे-
हा श्रीकृष्णाचा सर्वात चांगला गुण होता जो ते इतरांना मदत करत असत. सुदामा हा त्याचा गरीब मित्र होता पण राजा असूनही माधवला याचा अभिमान नव्हता. सुदामा त्याला भेटायला आला तेव्हा ते  सुदामाजींना घेण्यासाठी दारात पोहोचले . पांडवांची पत्नी द्रौपदी ही श्रीकृष्णाची बहीण होती, जेव्हा तिचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा देवकीनंदन तिच्या मदतीसाठी पुढे आले. जेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झाले आणि दोघेही मदतीसाठी द्वारकाधीशजवळ आले, तेव्हा कौरवांचे सैन्य खूप मोठे आहे हे जाणून कृष्णाने पांडवांना पाठिंबा दिला. श्रीमंत असो की गरीब,असो, कठीण प्रसंगी आपल्या प्रियजनांना साथ देण्यास त्यांनी मागे हटले नाही. त्यांचा हा गुण आपण अंगीकारू शकतो.
 
कुवत बघू नका -
मैत्री करताना गोपालने कधीही विचार केला नाही की त्याचा मित्र श्रीमंत आहे की गरीब. स्वतः राजा असल्याने त्याला सुदामाची मैत्री खूप आवडली. बालपणी एकाच आश्रमात दीक्षा घेतल्यावर दोघांची परिस्थिती बदलली, पण वर्षांनंतर सुदामा श्रीकृष्णाच्या राज्यात पोहोचला तेव्हा द्वारकाधीशने त्याचे स्वागत केले जणू सुदामापेक्षा मोठा आणि खास पाहुणा कोणीच असूच शकत नाही. कृष्ण हे प्रत्येकाच्या  सुख-दुःखाचे  साथीदार आहे.
 
योग्य मार्गदर्शन देणे- 
श्रीकृष्णाने नेहमी योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. महाभारताच्या काळात त्यांनी गीतेचा उपदेश केला. 'आपले काम करत राहा, फळाची इच्छा करू नका', धर्माचे रक्षण करण्यासाठी, आपल्याच लोकांच्या विरोधात उभे राहा, अशा अनेक शिकवणी त्यांनी अर्जुनाला दिल्या आणि सारथी बनून संपूर्ण युद्धात अर्जुन आणि पांडवांना साथ दिली. अर्जुनला जेव्हा जेव्हा त्रास झाला तेव्हा श्रीकृष्णाने त्याला योग्य मार्गदर्शन केले.
 



Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

Maa lakshmi : देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुळशीला या 5 वस्तू अर्पण करा

Sita Navami 2024: आज सीता नवमीचे व्रत केल्याने मिळेल मातृत्व

श्री सीता चालीसा : सीता नवमी या एका उपायाने प्रसन्न होईल देवी

Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या

आरती गुरुवारची

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

पुढील लेख
Show comments