Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोल्हापूर लोकसभा निवडणूक 2019

Webdunia
मुख्य लढत : संजय मंडलिक (शिवसेना) विरुद्ध धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
 
सलग दुसऱ्यांदा हे दोन्ही उमेदवार आमने-सामने उभे आहेत. धनंजय महाडिक हे सोळाव्या लोकसभा निवडणूकीत खासदार म्हणून निवडून आले. धनंजय महाडिक हे भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. २०१४ ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील खासदारकीची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा ३३,५४२ मतांनी पराभव केला होता. कोल्हापुरातील राजकीय आणि सहकार क्षेत्रात महाडिक कुटुंबिय गेल्या अनेक वर्षापासून आहे. धनंजय महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आला होता. संसदेत सर्वाधिक प्रश्‍न उपस्थित करून देशातील टॉप वन खासदार म्हणून निवड झाल्यानंतर महाडिक यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते. 

संबंधित माहिती

मुंबईत इमारतीच्या 40 फूट खोल सेप्टिक टँकमध्ये पडून दोन कामगारांचा मृत्यू

वंदे भारत गाड्यांमध्ये अर्धा लिटर पाण्याच्या बाटल्या मिळणार

उद्धव ठाकरेंच्या 'अभद्र' वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं सडेतोड उत्तर

कोटक महिंद्रा बँकेवर RBI ची कारवाई, क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी

75 फूट उंचीवरून महिला थेट ज्वालामुखीत पडली, मृत्यू

ब्रिटिश संसदेने रवांडा निर्वासन विधेयक मंजूर केले

मलेशियामध्ये दोन नौदलाचे हेलिकॉप्टरची जोरदार धडक सर्व 10 क्रू मेंबर्स ठार

IPL 2024: 56 चेंडूत शतक झळकावून रुतुराज गायकवाडने इतिहास रचला

LSG vs CSK : मार्कस स्टॉइनिसने IPL मधील 13 वर्षे जुना विक्रम मोडला

टेनिस स्टार नोव्हाक जोकोविचची वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून 5 व्यांदा निवड

पुढील लेख
Show comments