Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

First list of BJP s Lok Sabha candidates
Webdunia
शुक्रवार, 22 मार्च 2019 (08:07 IST)
भारतीय जनता पार्टीने लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नावासोबत नितीन गडकरी, राजनाथ सिंह, स्मृती इराणी अशा दिग्गज भाजपा नेत्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 
 
या यादीमध्ये बहुतांश विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिल्याचं पाहायला मिळालं, नागपूरमधून नितीन गडकरी, रावेरमधून एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे, जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे, चंद्रपूर येथून हंसराज अहिर, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित, अकोला लोकसभा मतदारसंघातून संजय धोत्रे, भिवंडीतून कपिल पाटील, उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी, बीडमधून प्रीतम मुंडे, मुंबई पश्चिम मध्य मुंबईतून पूनम महाजन, वर्धा येथून रामदास तडस, चिमूरमधून अशोक नेते, सांगली येथून संजयकाका पाटील या विद्यमान खासदारांना भाजपाने पुन्हा संधी दिली आहे.
 
तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट करत याठिकाणी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले डॉ. सुजय विखे पाटील यांनी संधी देण्यात आली आहे. तर लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल गायकवाड यांच्याऐवजी सुधाकरराव श्रृंगारे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: 'महाराष्ट्रात हिंदी भाषा लादू देणार नाही' म्हणाले उद्धव ठाकरे

रामदास आठवले यांचा राज ठाकरेंना इशारा, म्हणाले- आंदोलन योग्य आहे पण दबाव योग्य नाही

भारतात चित्त्यांची संख्या वाढणार, या देशांच्या घनदाट जंगलांमधून "पाहुणे" आणले जातील

दिल्ली : २० वर्षे जुनी ४ मजली इमारत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू

८ मे रोजी मुंबई विमानतळावरील विमान सेवा सहा तासांसाठी बंद राहणार

पुढील लेख
Show comments