Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पवार घराण्याला मोठा धक्का, पार्थ पवार पिछाडीवर

Webdunia
गुरूवार, 23 मे 2019 (12:54 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का बसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
 
मावळमध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांना कडवी लढत दिली होती. मुलाच्या विजयासाठी अजित पवार हे मावळमध्ये ठाण मांडून बसले होते. शेतकरी कामगार पक्षानंही राष्ट्रवादीला मदतीचा हात दिला होता. मात्र, या कशाचाही फायदा राष्ट्रवादीला झाल्याचं दिसत नाही. 

लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, कायद्यांतर्गत हद्दपारीवर बंदी घालण्याचा आदेश रद्द केला

हार्दिकने टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम रचला

तांत्रिकाच्या कृत्याने त्रस्त झालेल्या महिलांनी घेतला टोकाचा निर्णय केला हा गुन्हा

पाकिस्तानमध्ये भीषण रस्ता अपघात, 11 जणांचा मृत्यू

रोहन बोपण्णा ATP मास्टर्स सामना जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला

पुढील लेख
Show comments