सोशल मीडियावर कोरोना व्हायरसबद्दल अफवा पसरत असतात. अशात एका व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात येत आहे की जर व्यक्तीला कोणत्याही त्रासाशिवाय एका ठराविक वेळेपर्यंत श्वास थांबवणे शक्य होत असेल तर त्याला कोरोनाचा आजार नाही. यूजर्स याला कोरोना टेस्ट म्हणत शेअर करत आहे.
काय आहे व्हायल व्हिडिओमध्ये-
फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप, प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ खूप शेअर केले जात आहे. या व्हिडिओत एक रेषा आहे ती तीन भागात विभागली गेली आहे. पहिल्या भागात श्वास घेण्यास, दुसर्या भागात श्वास थांबवण्यास आणि तिसर्या भागात श्वास सोडण्यास सांगितलं जातं. व्हिडिओ शेअर करत यूजर्स लिहितात की “जरअ आपण बिंदूनुसार A से B पर्यंत श्वास धरुन ठेवत असाल तर आपण कोरोना मुक्त होऊ शकता.”
वेबदुनियाने व्हायरल होत असलेला दावा इटरनेटवर सर्च केला तर आम्हाला जागतिक आरोग्य संस्था (WHO) च्या वेबसाइटवर मिथ बस्टर सेक्शन सापडलं. यात लिहिलेले आहे की 10 सेकंद किंवा याहून अधिक काळ अस्वस्थ न होता श्वास न घेता थांबणे कोरोना मुक्त असल्याचा पुरावा नाही.
WHO ने स्पष्ट केले आहे की या ब्रीदिंग एक्सरसाइज द्वारे कोरोना संक्रमणाची तपासणी शक्य नाही. WHO प्रमाणे असे करणे धोकादायक आहे आणि लॅबमध्ये जाऊन कोरोना संक्रमणाची तपासणी योग्य पर्याय आहे.
WHO ने आपल्या ट्विटर हँडलवर या संबंधी ग्राफिक शेअर केलं आहे.
FACT: Being able to hold your breath for 10 seconds or more without coughing or feeling discomfort DOES NOT mean you are free from the #coronavirus disease or any other lung disease.