Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंतराळात पहिल्यांदाच टेनिसचा सामना

Webdunia
सोमवार, 27 ऑगस्ट 2018 (12:41 IST)
अमेरिकी अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात टेनिस खेळून अंतराळात पहिल्यांदाच टेनिस खेळण्याचा मान मिळविला. अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या यूएस ओपन स्पर्धेच्या उद्‌घाटनानिमित्त हा खेळ खेळण्यात आला. 
 
अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि यूएस टेनिस असोसिएशनने याचे आयोजन केले होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये (आयएसएस) झालेल्या या खेळात कमांडर अँड्र्यू फ्युस्टल, युरोपियन स्पेस एजन्सीचे तीन फ्लाइट इंजिनियर आणि नासाच्या दोन अंतराळवीरांनी भाग घेतला. गंमत म्हणजे अंतराळ स्थानकात गुरुत्वाकर्षण कमी असल्यामुळे टेनिस बॉल उसळलाच नाही. तसेच या अंतराळ स्थानकातील यंत्रसामुग्री खराब होऊ नये, यासाठी एक विशेष प्रकारचा सॉफ्टबॉल यासाठी वापरण्यात आला. अशा प्रकारे न उसळणार्‍या चेंडूने खेळणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे, असे फ्युस्टल याने या सामन्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र अखेर फ्युस्टल व त्याच्या जोडीदारानेच हा सामना जिंकला. या टेनिस खेळाचे थेट प्रसारण एका ग्लोबसारख्या शिल्पाच्या माध्यमातून करण्यात आले. न्यूयॉर्कमधील बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटरच्या बाहेर हे शिल्प लावण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

LIVE: चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांची शिक्षा, ४.७५ लाख रुपये दंड

कोण आहे गँगस्टर DK राव? ज्याला हॉटेल मालकाकडून खंडणी मागितल्याबद्दल मुंबई पोलिसांनी केली अटक

योगी खोटे रामभक्त, ओझा सरांची टीका

मुंबई: नालासोपारा येथे २०० कुटुंबांनी घरे गमावली, बुलडोझरने ३४ बेकायदेशीर इमारती पाडल्या

माजी सैनिकाची क्रूरता ! पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन प्रेशर कुकरमध्ये शिजवले

पुढील लेख
Show comments