Marathi Biodata Maker

परदेशी प्रेयसी तिचे केले अश्लिल व्हिडियो व्हायरल, अभिनेत्याला अटक

Webdunia
गुरूवार, 14 नोव्हेंबर 2019 (16:22 IST)
परदेशातील स्थित असलेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी मुंबईतून एका अभिनेत्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा अभिनेता मुंबई येथील मीरा रोडचा रहिवासी असून, त्याचे नाव राज सिंग असे आहे. तर विशेष म्हणजे या आरोपीने   तरुणीकडून तब्बल सात लाख रुपये देखील दबाव टाकत उकळले आहेत. यामध्ये बातमी अशी की, न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 30 वर्षीय तक्रारदार तरुणीसोबत सोशल मीडियावर राज सिंगची ओळख झाली. दोघांमधील संवाद वाढू लागला सोबतच ते दररोज मोबाईलवर चॅट करत होते. त्यांनी मैत्रीतून एकमेकांशी भावनिक बंध जुळले आणि ती मुलगी आरोपीच्या प्रेमात पडली होती. याचाच फायदा घेत सिंग ने तिचे काही खासगी व्हिडीओ आणि फोटो मागवले होते.
 
त्यांनी काही महिने एकमेकांशी चॅटिंग केल्यामुळे तरुणीने विश्वासाने राजला आपले व्हिडीओ पाठवले होते, मात्र जसे फोटो आणि व्हिडीओ हाती येताच राजचा सूरच बदलाल होता. राजने तिला धमकी दिली आणि ‘पैसे पाठवले नाहीस, तर तुझे खासगी व्हिडीओ आणि फोटो तुझ्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना आणि मित्र मंडळींना पाठवेन’ असे सांगितले. या धमकीला घाबरुन तिने टप्प्याटप्प्यात 10 हजार डॉलर्स असे जवळपास सात लाख रुपये राजला दिले.
 
नंतर तिने पैसे पाठवण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी राजने तरुणीचा एक व्हिडीओ तिच्या मित्राला पाठवला असल्याने तिने राजविरोधात इमेलद्वारे मीरा रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी राजला त्याच्या घरातून बेड्या  ठोकल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील १७ जागांसाठी महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला

सोलापूरमध्ये हॉटेलच्या खोलीत रील स्टार रोहिणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला; ३० जूनपूर्वी २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली जाणार

नाशिक जिल्ह्यातील काश्यपी धरणात जोडपे आणि दोन किशोरवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पुढील लेख