Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खग्रास चंद्रग्रहण कसं होतं? ग्रहणांचे किती प्रकार आहेत?

Webdunia
सोमवार, 24 मे 2021 (16:14 IST)
या वर्षातील पहिलं खग्रास चंद्रग्रहण येत्या बुधवारी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी 26 मे रोजी होणार आहे. दुपारी 3.15 ते सायंकाळी 6.23 दरम्यान हे ग्रहण होईल.
 
यावेळी चंद्र भारतातील दृश्य आकाशात नसल्यामुळे हे ग्रहण भारतात बहुतांश भागात दिसणार नाही. भारतातील अति-पूर्वेकडील राज्यांमध्ये काही प्रमाणात ग्रहण पाहण्यात येऊ शकतं, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
 
मात्र, असं असलं तरी यावेळी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ येणार असल्याने सुपरमून भारतातून दिसेल. बुधवारी, 26 मे रोजी या वर्षातील अखेरचं सुपरमून आहे. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटरवर आहे. 26 मे रोजी तो 3 लाख 57 हजार किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे तो मोठा आणि जास्त तेजस्वी दिसेल, असं सोमण यांनी सांगितलं.
 
ग्रहण ही अंतराळातील दुर्मिळ आणि अतुल्य अशी खगोलशास्त्रीय स्थिती म्हणून ओळखली जाते. नागरिक अत्यंत उत्सुकतेने ग्रहणाची प्रतीक्षा करत असतात. अनेक पर्यटक तर ग्रहण पाहण्यासाठी विविध देशांचं पर्यटन करत फिरतात.
ग्रहणाचं दर्शन घेण्याची वाट पाहत असलेल्या नागरिकांची प्रतीक्षा आता संपणार आहे. कारण येत्या 26 मे रोजी ग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी आपल्या सर्वांना मिळणार आहे. हे या वर्षातलं पहिलंच ग्रहण असून खगोलप्रेमी यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
 
आगामी ग्रहण हे खग्रास चंद्रग्रहण असून ते आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका खंडात दिसणार आहे. ग्रहणाचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.
 
साधारणपणे ग्रहण दोन प्रकारचे असून तांत्रिकदृष्ट्या दोन ताऱ्यांचा समावेश असलेला एक तिसरा ग्रहण-प्रकारही असल्याचं खगोलशास्त्रज्ञ जुआन काल्रोस बि्यामिन यांनी त्यांच्या इलुस्ट्रेटेड अॅस्ट्रोनॉमी या पुस्तकात लिहिलं आहे.
 
जुआन यांच्या पुस्तकात देण्यात आलेले ग्रहणांचे प्रकार खालीलप्रमाणे -
पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा घेता-घेता सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातल असतो.
 
यादरम्यान, चंद्र हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये आल्यानंतर जी स्थिती निर्माण होते, त्याला सूर्यग्रहण म्हटलं जातं.
 
तर, सूर्य आणि चंद्र यांच्यादरम्यान पृथ्वी आल्यानंतर निर्माण होणाऱ्या स्थितीला चंद्रग्रहण असं संबोधलं जातात.
 
ग्रहण कोणतंही असो त्याचे 3 प्रकार असतात. खग्रास ग्रहण, कंकणाकृती ग्रहण आणि खंडग्रास ग्रहण हे ग्रहणाचे तीन प्रकार आहेत. किती प्रमाणात चंद्र किंवा सूर्य झाकोळले जातात, किती प्रमाणात त्यांची सावली एकमेकांवर दिसून येते, त्यावर ग्रहणाचा प्रकार अवलंबून असतो. सूर्यग्रहण खग्रास, खंडग्रास आणि कंकणाकृती अशा तीन प्रकारचं असतं. तर चंद्रग्रहणाचे खग्रास, खंडग्रास आणि उपछाया असे तीन प्रकार आहेत.
 
या ग्रहणांची आपण सविस्तरपणे माहिती घेऊ -
 
खग्रास सूर्यग्रहण
खग्रास सूर्यग्रहणादरम्यान चंद्र पूर्णपणे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. त्यामुळे काही क्षण पृथ्वीवर चंद्राची संपूर्ण सावली पडते. या कालावधीत रात्र असल्याप्रमाणेच काही क्षण काळोख होतो.
नासाच्या शब्दांतच सांगायचं झाल्यास, खग्रास चंद्रग्रहण एका खगोलीय योगायोगामुळेच शक्य झालं आहे. सूर्य हा चंद्रापेक्षा 400 पटीने मोठा आहे. पण तो त्याहीपेक्षा 400 पटीने लांब अंतरावर आहे. त्यामुळेच खग्रास सूर्यग्रहण होणं शक्य आहे.
 
पण, हे विशिष्ट कोनातूनच दिसू शकतं. पृथ्वीच्या इतर भागातून ते काही प्रमाणात दिसतं, इतर भागात यालाच खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. जिथं हे ग्रहण पूर्णपणे दिसतं, त्या भागाला पाथ ऑफ टोटॅलिटी असं संबोधलं जातं. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यांची स्थिती यांच्यानुसार पृथ्वीवर हे ग्रहण कुठे दिसेल, ते अवलंबून असतं.
 
शास्त्रीयदृष्ट्या, सर्वात लांब सूर्यग्रहण 7 मिनिटं 32 सेकंदांपर्यंत चालू शकतं, असं जुआन सांगतात.
 
खग्रास सूर्यग्रहण इतकंही दुर्मिळ नाहीत. दर 18 महिन्यांनी पृथ्वीवर हे ग्रहण दिसू शकतं. मग यामध्ये दुर्मिळ असं काय, तर ज्याठिकाणी हे खग्रास ग्रहण दिसलं, तिथं 375 वर्षांनीच खग्रास सूर्यग्रहण पुन्हा दिसू शकतं, हे विशेष.
 
यंदाच्या वर्षीही खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. मात्र ते स्पष्टपणे पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी तुम्हाला अंटार्क्टिका खंडावर जावं लागेल, असं जुआन यांनी सांगितलं.
 
कंकणाकृती सूर्यग्रहण
एखाद्या सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून थोडा दूर असेल. या स्थितीत तो पूर्णपणे सूर्याच्या मध्यभागी आला. यादरम्यान एका अंगठीप्रमाणे सूर्य दिसत असल्यास त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हटलं जातं. हे ग्रहणसुद्धा विशिष्ट भागातूनच पाहिलं जाऊ शकतं.
येत्या 10 जून रोजी उत्तर गोलार्धातील कॅनडा, ग्रीनलँड, रशिया या देशांमध्ये काही प्रमाणात कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळणार आहे. युरोप तसंच मध्य आशिया आणि चीन या देशांमधूनही थोडाफार ग्रहणाचा प्रभाव दिसून येईल.
 
नासाच्या माहितीनुसार कंकणाकृती सूर्यग्रहण हे बराचवेळ चालतात. काही ठिकाणी ते दहा मिनिटांपर्यंत तर काही ठिकाणी पाच ते सहा मिनिटांसाठी पाहिले जाऊ शकतात.
 
खंडग्रास सूर्यग्रहण
ज्या ग्रहणावेळी सूर्याचा फक्त काहीच भाग सावलीने व्यापलेला दिसतो, अशा ग्रहणाला खंडग्रास सूर्यग्रहण संबोधलं जातं.
कंकणाकृती किंवा खग्रास सूर्यग्रहणाच्या स्थितीपेक्षा किंचित पुढे मागे चंद्राची स्थिती असल्यास खंडग्रास सूर्यग्रहण दिसून येतं. खंडग्रास सूर्यग्रहण ही दुर्मिळ मानली जातात. एकूण सूर्यग्रहणांपेक्षा फक्त 4 टक्के ग्रहण खंडग्रास प्रकारची असू शकतात, असं IAC संस्थेने म्हटलं आहे.
 
शेवटचं खंडग्रास सूर्यग्रहण 2013 मध्ये झालं होतं. तर पुढील खंडग्रास सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी दिसणार आहे, असं IAC ने सांगितलं आहे. हे ग्रहण इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि पपुआ न्यू गिनी या देशांमधून पाहता येऊ शकेल.
 
खग्रास चंद्रग्रहण
नासाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य हे सरळ एका रेषेत आल्यानंतर खग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. यावेळी चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीखाली येतो. पण तरीही काही प्रमाणात सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतोच. यावेळी चंद्राचा हा भाग थोडा लालसर दिसू लागतो. याला ब्लड मून असं संबोधलं जातं.
IAC च्या माहितीनुसार, पृथ्वीचा आकार चंद्रापेक्षा चार पटीने मोठा असल्याने चंद्रग्रहण 1 तास 44 मिनिटांपर्यंत चालू शकतं. येत्या 26 मे रोजी अशाच प्रकारचं चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे.
 
पश्चिम-दक्षिण अमेरिका, दक्षिण-पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया काही प्रमाणात अमेरिकेतील पश्चिम भाग याठिकाणी हे चंद्रग्रहण पाहता येऊ शकणार आहेत. इथं सुपर फ्लॉवर फुल मून सुमारे 14 मिनिटं पाहायला मिळू शकतं.
 
सूर्य आणि चंद्रग्रहणात फरक काय असा प्रश्न आपल्याला पडला आहे. याचं उत्तर म्हणजे सूर्यग्रहण पृथ्वीवरील विशिष्ट भागातूनच पाहता येऊ शकतं. पण चंद्रग्रहण काही प्रमाणात अख्ख्या जगभरातून पाहायला मिळू शकतं.
 
खंडग्रास चंद्रग्रहण
चंद्राचा फक्त काही पृष्टभागच पृथ्वीच्या सावलीखाली आल्यास खंडग्रास चंद्रग्रहणाची स्थिती निर्माण होते. ही सावली किती मोठी आहे, तितका याचा प्रभाव दिसून येतो. यावेळी चंद्राच्या इतर भागांवर गडद लालसर किंवा चॉकलेटी रंगछटा दिसू शकतात.
उघडा भाग आणि सावलीखालील भाग यांचं मिश्र स्वरुप तयार होऊन चंद्रावर विविध रंगछटा दिसतात.
 
खग्रास चंद्रग्रहण दुर्मिळ असून दोन वर्षांच्या अंतराने ते दिसू शकतात. मात्र खंडग्रास चंद्रग्रहण वर्षातून दोन वेळा दिसू शकतं.
 
आगामी खंडग्रास चंद्रग्रहण 18-19 नोव्हेंबर 2021 रोजी दिसेल. उत्तर-दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, काही प्रमाणात युरोप तसंच आशिया खंडांमध्ये ते पाहिलं जाऊ शकतं.
 
छायाकल्प चंद्रग्रहण
या ग्रहणप्रकारात पृथ्वीची किंचित सावली चंद्रावर पडलेली असते. ती अतिशय पुसट असू शकते. मानवी डोळ्यांना ते चटकन लक्षात येईल इतकंही प्रभावी नसतं. अतिशय छोट्या स्वरुपाचं हे ग्रहण असतं. कधी-कधी तर असे चंद्रग्रहण कॅलेंडरमध्ये नोंदवलेलेही नसतात.
स्टेलार ग्रहण
स्टेलार ग्रहण ही नवी संकल्पना जुआन बिअॅमिन यांनी त्यांच्या पुस्तकात मांडली आहे.
 
त्यांच्या मते, पृथ्वीवर फक्त चंद्र किंवा सूर्याचेच ग्रहण होतात, असं नाही.
 
या दोहोंशिवाय इतर ग्रहांसोबतही विशिष्ट स्थिती निर्माण झाल्याने ग्रहण होऊ शकतात. असं जुआन यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये लागली भीषण आग

आसाममध्ये 10 महिन्यांच्या बाळाला एचएमपी विषाणूची लागण

LIVE: संजय राऊतांची नगरपालिका निवडणुका एकट्याने लढवण्याची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मानवी' वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

राज्यात जनता दरबार घेण्याचे अजित पवार यांचे आदेश, या दिवशी भरणार दरबार

पुढील लेख
Show comments