Marathi Biodata Maker

अखेर जगातील पहिल्या हायपरपूलला राज्य सरकारची मान्यता किती मिनिटात कापणार मुंबई पुणे अंतर जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (17:01 IST)
आर्थिक राजधानी मुंबई येथून फक्अत अर्ध्या तासात सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे गाठण्याचं स्वप्न येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार असून, विमानाने नव्हे, तर ‘हायपरलूप’ च्या माध्यमातून ही दोन शहरं केवळ 31 मिनिटांच्या अंतरावर जोडली जाणार आहे. राज्य सरकारने ‘वर्जिन हायपरलूप’ व ‘डीपी वर्ल्ड’ यांच्या कराराला पूर्ण  मान्यता दिली. जगातील पहिला हायपरलूप ट्रॅक मुंबई आणि पुणे या दोन शहरांदरम्यान सुरु होणार आहे. या हायपरलूप प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेची फार मोठी  बचत होणार आहे. तर रोजगाराच्या हजारो  संधी उपलब्ध होतील. हा प्रकल्प 36 बिलियन डॉलर म्हणजेच (अंदाजे 2 लाख 50 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक) आर्थिक नफा होईल, असाही अंदाज राज्य सरकारने व्यक्त केला आहे. मुंबईहून पुणे गाठण्यासाठी साडेतीन तासांचा अवधी लागतोच मात्र येत्या भविष्यात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक व्यवस्था अधिक बिकट होईल. यामध्ये मग मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेन (किंवा पॉड)ने केवळ 31 मिनिटांत हे अंतर गाठता येईल. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

प्रसिद्ध खेळाडूने निवृत्तीचा निर्णय मागे घेतला

तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

LIVE: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती

मेस्सी लवकर निघून गेल्यानंतर चाहते संतापले; कोलकातामध्ये स्टेडियमवर बाटल्या आणि खुर्च्या फेकल्या

Pune land dispute 'पार्थ पवार यांच्या वादग्रस्त जमीन व्यवहारात रजिस्ट्रारचा निष्काळजीपणा,'अजित पवार यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments