Marathi Biodata Maker

लॉकडाउन म्हणजे काय

Webdunia
सोमवार, 23 मार्च 2020 (10:39 IST)
'लॉकडाउन' (Lock Down) चा शाब्दिक अर्थ आहे ताळाबंदी... ज्या प्रकारे एखाद्या फॅक्ट्रीला बंद केलं जातं तेथे ताळाबंदी केली जाते आणि कोणीही आत जाऊ शकतं नाही. दुर्मिळ प्रसंगी लॉक डाऊनचा निर्णय घेतला जातो. लॉक डाऊन नागरिकांच्या जीविताची काळजी घेण्यासाठीच घेतला जातो. दहा हजार लोकांना आपला ग्रास केलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगात हाहाकार होत आहे, ज्यामुळे खाजगी कंपन्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे ज्याने कर्मचार्‍यांचे प्राण वाचू शकतात. 
 
संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन केला जातो. युद्ध, साथीचे आजार आणि आणीबाणी अशा प्रसंगी लॉक डाऊन करतात. लॉकडाउन करण्यात आलेल्या ठिकाणांवर लोकांना घरातून बाहेर पडण्यास मनाही असते. केवळ धान्य, औषधी, भाज्या अशा गरजेच्या वस्तूंसाठीच बाहेर पडण्याची परवानगी असते. या दरम्यान बँकांमधून पैसेही काढता येतात.
 
लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सेवा वगळता सर्व सेवा बंद ठेवण्यात येतात. शाळा, महाविद्यालयेही, कंपन्या, ऑफिस, दुकाने बंद ठेवली जातात. बाहेर पडणाऱ्यांना आवश्यक कारण देऊनच बाहेर पडता येतं.
 
या दरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद असल्याने ऑनलाइन खरेदी करण्याची मुभा असते किंवा केवळ जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडण्याची परवानगी असते. या काळात परिस्थिती पाहून पब्लिक ट्रांसपोर्ट अर्थात बसेस, ऑटो, रिक्षा आणि रेल्वेच्या फेऱ्याही रद्द केल्या जातात. लॉक डाऊनच्या काळात जमावबंदी असते. बाहेर फिरण्यासही मुभा नसते.
 
लॉक डाऊनमध्ये नागरिकांना त्यांचा परिसर सोडून दुसरीकडे जाण्यास मनाई केली जाते. आणीबाणीच्या काळात हा निर्णय घेतला जात असतो. लॉक डाऊन किती काळासाठी असेल हे तत्कालीन परिस्थितीवर अवलंबून असतं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू, तिघे जखमी

दारू पाजून शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर केले दुष्कर्म

पुण्यातील कोयता गँगचा नायनाट करण्याचे अजित पवारांचे वचन

पुढील लेख
Show comments