Marathi Biodata Maker

शिवसेनेची भूमिका तोंडच न दिसणार्‍या केसाळ कुत्र्यासारखी : राज ठाकरे

Webdunia
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (09:22 IST)
शिवसेनेची भूमिका तोंडच न दिसणार्‍या केसाळ कुत्र्यासारखी आहे, अशा शब्दांत भारतबंदला विरोध करणार्‍या शिवसेनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली आहे. शिवसेनेने बंदला विरोध करीत विरोधकांवरच टीका केली होती. शिवसेनेला स्वतःची भूमिका राहिली नाही, ह्यांची पैश्याची कामे अडली की हे सत्तेतून बाहेर पडायची धमकी देतात आणि ती झाली की सत्तेत राहतात. भाजपा सत्तेत असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणे, गॅसचे दर वाढणे हे लाजिरवाणे आहे.
 
इंधनाचे दर आमच्या हातात नाही मग जेव्हा विरोधात होतात तेव्हा आंदोलन का केले होते? असे विचारताना तुमच्या हातात जर दरांचे नियंत्रण  नाही तर आंध्र प्रदेश आणि राजस्थान सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कसे कमी केले असाही प्रश्न  ठाकरें यांनी उपस्थित केला.  आमच्यासाठी महत्त्वाचे पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत. महागाईचा भडका उडाला आहे त्यामुळे बंद कुणी पुकारला आहे याचा विचार न करता आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आंदोलन केले असेही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 100 जागा स्वबळावर लढण्याची तयारी केली, 30 डिसेंबर रोजी निर्णय होणार

लातूरमध्ये तरुणाची पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या

LIVE: अजित पवार आणि शरद पवार युती फिस्कटली

शिंदेसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

फिल्डिंग करताना मुंबईचा खेळाडू कोसळला

पुढील लेख
Show comments