Dharma Sangrah

सलमान खानला दिलासा, परदेशवारीला परवानगी

Webdunia
बुधवार, 18 एप्रिल 2018 (08:44 IST)

काळवीट शिकारप्रकरणात सलमान खानला जोधपूर न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. न्यायालयाने सलमानला २५ मे ते १० जुलै या कालावधीत परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. या कालावधीत सलमान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिका या तीन देशांमध्ये जाणार आहे.

जोधपूरजवळील जंगलात १९९८ साली दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ एप्रिल रोजी जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या सलमान जामिनावर बाहेर आहे. निकालानंतर त्याच्या परदेशवारीवर निर्बंध आले होते. सलमानच्या वतीने मंगळवारी जोधपूर न्यायालयात परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

अमेरिकेचा नायजेरियात आयसिसवर प्राणघातक हल्ला, डोनाल्ड ट्रम्पचा दहशतवादी संघटनेला इशारा

Flash Back : क्रिकेटपासून बुद्धिबळापर्यंत, या वर्षी विक्रम मोडले

मुंबईकरांचा त्रास वाढणार, एक महिन्याचा ब्लॉक जाहीर, 26-27 डिसेंबर रोजी300 हून अधिक गाड्या रद्द

आजपासून रेल्वे प्रवास महागला, तुमच्या खिशावर किती परिणाम होईल? जाणून घ्या

शरद पवार आणि अजित पवार युतीबद्दल चर्चा सुरु असल्याचे सुप्रिया सुळे यांनी संकेत दिले

पुढील लेख
Show comments