rashifal-2026

इथे भरवली जाते आळशी लोकांची स्पर्धा!

Webdunia
सध्याची लाइफस्टाइलची जीवनशैली फारच धावपळीची झाली आहे. अनेकांना या लाइफस्टाइलमुळे डिप्रेशन, स्ट्रेसचा सामना करावा लागत आहे. अनेकांना तर आराम करायलाही वेळ मिळत नाही. असे म्हणता येईल की, जीवनाच्या या धावपळीत थकना मना हैं...पण हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, एक देश असाही आहे जिथे लोक एक दिवस थकू शकतात आणि पूर्ण दिवस बेडवर आळस करत पडून राहू शकतात. हा देश आहे कोलंबिया. 
 
या देशातील लोक तणावाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येकवर्षी 'आळस दिवस' दिवस साजरा करतात.
 
कोलंबियाच्या इतागुई शहरात गेल्या रविवारी 'वर्ल्ड लेझिनेस डे' साजरा करण्यात आला. यासाठी लोक आपल्या घरातून उश्या, गादी, बेड घेऊन रस्त्यावर झोपताना दिसले. 
 
संपूर्ण दिवसभर आळस करण्याचा हा खास दिवस नवीन नाहीये. 1985 पासून हा दिवस साजरा केला जातो. म्हणजे गेल्या 33 वर्षांपासून हा दिवस साजरा केला जातो.
 
कोलंबियातील इतागुई शहराची लोकसंख्या 2 लाख इतकी आहे. 33 वर्षांपूर्वी एक नागरिक मारियो मोटोंयाने हा विचार आणला होता. त्याने म्हटले होते की, लोकांकडे एक आराम करण्याचा दिवस असावा.
 
या दिवशी आळशी लोकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात. म्हणजे कुणाचा पायजामा सर्वात चांगला आहे किंवा कोण सर्वात लवकर बेडवर पोहोचू शकतो, अशाया स्पर्धा असतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

मुंबईत मनसे उमेदवारांची अंतिम यादी राज ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी सादर

शिंदे कुटुंबाचा सातारा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध... संजय राऊतांचा आरोप

LIVE: प्रशांत जगताप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

उदयपूरमध्ये चालत्या कारमध्ये महिला मॅनेजरवर सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक

गुजरातला भीषण भूकंपाचा धक्का

पुढील लेख
Show comments