Marathi Biodata Maker

उंदीर घोटाळा, शिवसेनेचा भाजपाला चिमटा

Webdunia
शनिवार, 24 मार्च 2018 (09:22 IST)

उंदीर घोटाळ्यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपावर टीका करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात ‘उंदीर घोटाळा’ झाल्याचा स्फोट केला. त्यामुळे देशभरातील घोटाळ्यांमध्ये आणखी एका घोटाळ्याची आणि त्याच्या सुरस कथेची भर पडली. खडसे यांनी कोणत्या हेतूने या घोटाळयाचा स्फोट केला हे त्यांनाच माहीत, पण यानिमित्ताने सरकारी तिजोरी कुरतडलीही जाऊ शकते आणि उंदीर हे ‘कार्य’ करू शकतात, हे उघड झाल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

राज्याच्या इतर भागातील उंदरांनाही मंत्रालयातील उंदरांचा हेवा वाटतोय. मंत्रालयात आपली निदान डेप्युटेशनवर नेमणूक व्हावी अशी त्यांची इच्छा असून सामान्य प्रशासन विभागाने तसा आदेश काढावा यासाठी ते प्रयत्नशील असल्याचेही समजते, असे सांगत शिवसेनेने भाजपाला चिमटा काढला .

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

टाटा ओपन गोल्फ: टाटा ओपनमध्ये जगलान आणि संधू यांची संयुक्त आघाडी

भारताने नूर खान एअरबेसवर मोठा हल्ला केला..., पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची मोठी कबुली

शिवसेनेच्या नगरसेवकाच्या पतीच्या हत्येप्रकरणी रायगडमध्ये नऊ जणांना अटक

बीएमसी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेमध्ये 227 पैकी 207 जागांवर सहमती

जालन्यात दुर्दैवी अपघात, नदीच्या काठावर भरलेल्या खड्ड्यात 65 वर्षीय महिला आणि 5 वर्षांचा नातवाचा बुडून मृत्यू

पुढील लेख
Show comments