Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

McDonald मध्ये 'Happy Meal' ठरली 'Unhappy', 2 लाखांचा दंड

McDonald
Webdunia
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (15:31 IST)
ल्युटन- मॅक्डोनाल्ड्सचं 'हॅपी मिल' खूप प्रसिद्ध असून साधारणपणे यासाठी 200 रुपये मोजावे लागतात. पण हॅपी मिल नंतर 2 लाख रुपयांचा दंड भरण्याची वेळ आली तरी सर्वंच अनहॅपी होईल. ब्रिटनमध्ये नुकतीच अशा प्रकारची घटना समोर आली आहे ज्यात एका व्यक्तीला आपल्या नातवाला हॅपी मिल खाऊ घालणे भलतेच महागात पडले. यासाठी त्यांना 2 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
 
मिळालेल्या वृत्तानुसार इंग्लंडमधील ल्युटनमध्ये राहणार्‍या जॉन बॅबेज ला हा फटका बसला आहे. ते आपल्या नातू टायलरला हे मिल खाऊ घालण्यासाठी घेवून गेले होते. यासाठी त्यांनी 2.79 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 200 रुपये दिले. परंतु त्यानंतर त्याच्या एका कृत्यामुळे त्यांना 2,800 डॉलर म्हणजेच 2 लाखांचा दंड भरावा लागला आहे. 
 
झाले असे की हे मिल खाऊन झाल्यानंतर त्यांचा नातू काहीकाळ मित्रांबरोबर खेळण्यासाठी थांबला आणि तेव्हा त्यांनी गाडी फ्री पार्किंगमध्ये पार्क केली होती. ते झोपी गेले आणि त्यांची फ्री पार्किंगची वेळ संपली. 2 तासांची फ्री पार्किंगची वेळ झाल्यावर त्यांना 17 मिनिटं झाली. आणि यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला.
 
 
75 वर्षीय बॅबेज यांना या बद्दल कोणतीही माहिती नव्हती. आणि विशेष म्हणजे दंडाच्या पावत्या अस्तित्वात नसलेल्या पत्त्यावर पाठवण्यात आल्या. परंतु एक दिवस अचानक वसूली करणार्‍या कंपनी डीसीबीएलच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी येत दंडाची रक्कम भरण्याची मागणी केली. यामध्ये 400 युरो दंड आणि 1,651 युरो असे एकूण भारतीय चलनात 2 लाख रुपये भरण्याची मागणी केली गेली.
 
दरम्यान, यापूर्वी देखील मॅक्डोनाल्ड्स मिलसाठी अनेकांना दंड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अलीकडेच एका महिलेला आपल्या बहिणीसह 100 मैलचा प्रवास केल्याप्रकरणी 200 युरोंचा दंड ठोठावण्यात आला होता. साथीच्या आजरात लिंकनशायर ते स्कार्बरोपर्यंत तीन काउंटींतून प्रवास करणं हे आवश्यक नसल्याचं म्हणत या महिलेला दंड ठोठवण्यात आला होता. या व्यतिरिक्त 160 किलोमीटरचा प्रवास करत कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन करत येथे आलेल्या एका व्यक्तीला 200 युरोचा म्हणजेच 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

एमआयडीसी फॉइल कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई आणि नोकरी जाहीर केली

मुंबईत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

यवतमाळ जिल्ह्यात एका झाडाने शेतकऱ्याला करोडपती केले

एलएसजीने गुजरात टायटन्सचा 6 गडीने पराभव केला,टॉप-4 मध्ये स्थान मिळवले

पुढील लेख
Show comments