Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोठ्या राजकीय हालचाली; पंकजा मुंडेंविरोधात ज्योती मेटे मैदानात?

Webdunia
बुधवार, 27 मार्च 2024 (11:33 IST)
बीड : लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना पक्ष एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याने ही लढाई रंगतदार होत आहे. गेल्या ४ वर्षांपासून राजकीय वनवासात असलेल्या पंकजा मुंडेंना भाजपाने लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे.
 
बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडें ऐवजी पंकजा मुंडेंना तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे, पंकजा यांनी समाधान व्यक्त करत प्रचाराचा शुभारंभही केला. दुसरीकडे पंकजा मुंडेंविरुद्ध कोण, असा प्रश्न असतानाच आता ज्योती मेटेंनी निवडणूक लढण्याची घोषणाच केली आहे.
 
महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यंदाच्या निवडणुकीत प्रभावीपणे लक्ष देऊन कंबर कसली आहे.बीड लोकसभा मतदारसंघावरही त्यांनी विशेष लक्ष दिले असून काही दिवसांपूर्वीच गतवर्षीचे पराभूत उमेदवार बजरंग सोनवणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करुन घेतला आहे.
 
दुसरीकडे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशीही शरद पवारांनी तब्बल दीड तास चर्चा केली. ज्योती मेटे यांनी पुण्यातील मोदी बाग इथे शरद पवारांची भेट घेतली असून बीड लोकसभेबाबत पवार आणि मेटे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे, पंकजा मुंडेना तगडं आव्हान बीडमधून देण्यात येणार असल्याचे दिसून येते.
 
मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या विनायक मेटेंच्या पत्नी असल्याने ज्योती मेटेंच्या भूमिकेकडे मराठा समाजाचेही लक्ष लागले आहे. त्यातच, ज्योती मेटेंनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असून आता निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचं म्ह्टलं आहे. शिवसंग्राम पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील चर्चेनंतर ज्योती मेटेंनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. तसेच, कोणत्या पक्षाकडून की अपक्ष, ह्याबाबत आपण लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.
 
त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघातून विरुद्ध ज्योती मेटे असाच सामना रंगणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मात्र, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही अग्रस्थानी असून उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी २४ मार्च रोजीच्या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात एक मराठा उमेदवार देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे, बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे ह्या उमेदवार असल्यास पंकजा मुंडेंची डोकेदुखी वाढू शकते. कारण, बीड जिल्ह्यात मराठा समाजा मोठ्या प्रमाणात असून मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर येथील गणितं बदलू शकतात. त्यातच, जरांगे यांच्यामुळे बीड जिल्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्रस्थानी आहे.

Edited By- Ratnadeep ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

CNG Price Hike in Mumbai : मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

LIVE: मतदान संपताच मुंबईत CNG महाग,जाणून घ्या नवीन किंमत

भारतीय नौदलाला मासेमारी जहाजाची धडक

Sukma: सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार

सांगली जिल्ह्यात कंपनीत गॅस गळतीमुळे 3 जणांचा मृत्यू, 9 जखमी

पुढील लेख
Show comments