suvichar

Beautiful Alibaug नितांत सुंदर अलिबाग किनारा

Webdunia
रविवार, 30 एप्रिल 2023 (00:10 IST)
अलिबाग जवळच असलेला कुलाबा जलदुर्ग दक्षिणोत्तर 267 ते 927 मीटर लांब आणि पूर्वपश्चिम 109 मीटर रूंद अशा बेटावर आहे. ओहोटी आल्यानंतर किल्ल्यात चालत जाता येते. सुरूची उंच उंच झाडे, त्यांच्याशी हितगुज करणारी नारळाची झाडं, गालिचा अंथरल्यासारखी मऊशार वाळू, समोर अथांग अरबी समुद्र आणि समुद्रात रखवालदारासारखा ताठ मानेने उभा असलेला कुलाबा किल्ला. हे वर्णन आहे अलिबाग बीचचं. अलिबाग बसस्थानकात उतरल्यानंतर साधारण 1 कि.मी. पश्चिमेला चार ते पाच कि.मी. लांबीचा वालुकाम समुद्रकिनारा आहे. स्वच्छ आणि सुंदर तसेच प्रदूषणमुक्त किनारा म्हणून अलिबागचा किनारा ओळखला जात असला तरी अलीकडे हातगाडीवालंची गर्दी येथील शांतता भंग करते, यात शंका नाही. अलिबागपासून नैर्ऋत्येस सुमारे 300 मीटर अंतरावर कुलाबा किल्ला आहे.
 
भरतीच्या वेळेस किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. कुलाबा किल्ल्यापासून समुद्रात 3-5 कि.मी. नैर्ऋत्येकडे 60 फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. सांकाळच्या वेळेस अलिबाग समुद्र किनार्‍यावरची दृश्ये अवर्णनीय असतात. मावळतीला जाताना समुद्रात बुडणारा तांबडा भडक सूर्य   पाहताना माणूस देहभान विसरून जातो. सूर्य बुडलनंतरही त्याच्या नयनमनोहारी प्रभा, आकाशातील विविध आकाराचे ढग, फिरण्यासाठी  आलेले आणि आपल्याच तंद्रीत चालणारे अलिबागकर हा देखावा अनुभवतात.
 
तिन्हीसांजेला पाठीवरचे जाळे सांभाळीत आपल्याच मस्तीत गाणे गात घरी निघालेल्या मच्छिमार बांधवांच्या कोळीगीताला दाद देण्याचा मोह आवरता येत नाही. अलिबाग समुद्र किनार्‍यावर सूर्यास्तात जेवढा आकर्षक आहे तेवढाच सूर्योदयदेखील आहे. कुलाबा किल्ल्याजवळून सूर्योदय बघताना किनार्‍यावरील बंगले, मंदिरे, लांबवर पसरलेल्या नारळी पोफळीच्या गर्द राई आणि वनश्रीमध्ये लपलेले अलिबाग दृष्टीस पडते. 
 
अलिबागचा समुद्रकिनारा नयनरम्य असला तरी किल्ल्यात जाणार्‍या पर्यटकांनी ओहोटी आणि भरतीच्या वेळा पाहूनच किल्ल्यात जावे. भरतीच्या सुरू झाल्यानंतर किनार्‍याला येण्याची घाई करू नये. ओहोटी सुरू होईपर्यंत किल्ल्यातच थांबावे लागते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर आपली चांगली कामगिरी सुरू ठेवत हॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकले

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ महू Bhim Janm Bhoomi Mhow

आशा भोसले यांच्या वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुलगा आनंद ने दिली मुखाग्नी

आशा भोसले या जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या कलाकार होत्या, त्यांच्या नावावर अनेक विक्रम आहे

आशा भोसले यांच्या 'दम मारो दम' या सुपरहिट गाण्यावर बंदी घालण्यात आली होती

पुढील लेख
Show comments