Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भृशुंड गणेश भंडारा

Webdunia
गुरूवार, 16 जानेवारी 2025 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक पर्यटन स्थळे आहे. तसेच महाराष्ट्रात अनके प्राचीन वास्तू देखील असून दरवर्षी अनेक पर्यटक महाराष्ट्रात दाखल होत असतात. भंडारा हा महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख जिल्हा आहे. भंडारा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेजवळ आहे. भंडारा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबईपासून सुमारे 900 किलोमीटर अंतरावर आहे. 
ALSO READ: Sri Girijataka Ganapati लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक गणपती पूर्ण माहिती
तसेच महाराष्ट्रातील भंडारा येथे भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहे. भंडारा येथे वैनगंगा नदी वाहते. येथे पाच नद्या एकत्र येतात. भंडारा शहरातील प्राचीन किल्ले, मंदिरे आणि नैसर्गिक ठिकाणे पाहण्यासारखी आहे. तसेच भंडारा मध्ये भृशुंड गणेश मंदिर असून हे मंदिर  भगवान गणेशाला समर्पित आहे. तसेच भृशुंड गणेश 'मेंढ्याचा गणपती' म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही जर भांडार येथे जात असाल तर  भृशुंड गणेश 'मेंढ्याचा गणपती'  येथे नक्की भेट द्या.  
 
भंडारा शहरात असलेला भृशुंड गणेश 'मेंढ्याचा गणपती' म्हणून स्थानिक लोकांत प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या मूर्तीला लांब दाढी आणि मिश्या आहे. येथे गणपतीची एक अतिशय सुंदर मूर्ती दिसते. हे विदर्भातील अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात, गणपतीची अष्टविनायक मूर्ती दिसते, जी खूपच आकर्षक दिसते. मंदिर खूप मोठे आणि खूप सुंदर आहे. मंदिर परिसरात इतर अनेक देवता देखील दिसतात. येथे हनुमान जी आणि शिवशंकर जी देखील दिसतात.
 
तसेच या मंदिराची आख्यायिका अशी सांगतात, महर्षी भृशुंडीऋषींचा आश्रम या परिसरात होता. त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ते स्वत:च गणपतीरुप झाले ती ही मूर्ती असे या गणपतीबाबत सांगितले जाते. गणपतीचे हे मंदिर काही काळ पूर्णपणे दूर्लक्षित होते. एखाद्या कॉलनीतले हनुमान मंदिर असावे तेवढेच आणि तसचं हे मंदिर होते. पण या गणपतीचे महत्व लक्षात येऊन भक्तांनीं आता या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम केले. हे मंदिर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण कल्की 2898 एडी भाग 2 च्या शूटिंगसाठी सज्ज

स्त्री 3' मध्ये अक्षय कुमारची एंट्री निश्चित झाली

स्काय फोर्स चित्रपटाचा अप्रतिम ट्रेलर रिलीज, अक्षय कुमार-वीर पहाडियाचा ॲक्शन अवतार दिसला

सोनू निगमची मराठमोळी सुरुवात,आपल्या सुमधुर आवाजाने गायलं २०२५ चं पहिलं गाणं ‘चंद्रिका’

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

सर्व पहा

नवीन

भृशुंड गणेश भंडारा

अक्षय कुमारने 'भूत बांगला'च्या सेटवर तब्बूचे केले स्वागत, 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा ही जोडी दिसणार एकत्र

अमर सागर सरोवर राजस्थान

भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार

नीना गुप्ता यांची नात आणि मसाबा गुप्ता यांच्या मुलीचे नाव जाहीर

पुढील लेख
Show comments