suvichar

Shani Dev Jayanti महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिद्ध न्यायदेवता शनी मंदिरे

वेबदुनिया फीचर टीम
शनिवार, 16 मे 2026 (07:30 IST)
Maharashtra Tourism : महाराष्ट्रात शनी देवांची अनेक जागृत आणि प्रसिद्ध मंदिरे आहे. महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीत शनी देवतेला 'न्यायदेवता' मानले जाते. महाराष्ट्रात शनिदेवाचे अनेक जागृत आणि प्रसिद्ध मंदिरे असून यापैकी काही अत्यंत प्रसिद्ध आणि भक्तांनी भरलेली मंदिरांची यादी आज आपण पाहणार आहोत. जिथे तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात.
ALSO READ: Famous Temples in Maharashtra महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरे केवळ धार्मिक स्थळे नसून वास्तुकलेचा अद्भूत नमुना
महाराष्ट्रातील काही अतिशय प्रसिद्ध शनी मंदिरांची माहिती
शनी शिंगणापूर (अहमदनगर)
शनी शिंगणापूरचे शनी मंदिर हे महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगातील सर्वात प्रसिद्ध शनी मंदिर आहे. या गावात कोणत्याही घराला कुलूप किंवा दरवाजे नसतात. असे मानले जाते की शनी देव स्वतः घरांचे रक्षण करतात. येथे शनी देवाची मूर्ती नसून एक काळा पाषाण (शिला) आहे, जो चौथऱ्यावर आहे. मंदिराला छत किंवा दारे नाहीत. हे स्थान नेवासा तालुका, जिल्हा अहमदनगर मध्ये येते.   
शनिवार, अमावस्या आणि शनी जयंतीला प्रचंड गर्दी येथे प्रचण्ड गर्दी असते.

राक्षसभुवन शनी मंदिर - गेवराई तालुका, बीड जिल्हा
राक्षसभुवन शनी मंदिर हे शनिदेवाच्या साडेतीन पीठांपैकी पूर्ण पीठ असून  प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे या मंदिराची रामायण काळाशी संबंधित आख्यायिका आहे. शनैश्वर मंदिर गोदावरी नदीच्या काठी वसलेले हे एक अतिशय जुने आणि जागृत देवस्थान मानले जाते. असे म्हटले जाते की हे मंदिर साडेतीन शक्तिपीठांपैकी एकाच्या जवळ आहे आणि याचे आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे.

बीड शनी मंदिर
साडेतीन शनी पीठांपैकी अर्ध पीठ असून राजा विक्रमादित्य काळापासूनचे मंदिर स्थापित आहे.

सोळशी (सोलाशी) शनी मंदिर - कोरेगाव तालुका, सातारा जिल्हा
हरळीच्या डोंगराच्या पायथ्याशी सुंदर ठिकाण असलेले शनी देव, शिव मंदिर आणि इतर देवतांसह परिसर खूप सुंदर आहे. येथे शनिवारी मोठी गर्दी आणि भाविकांचा ओघ असतो.

देवनार शनी देवालयम - देवनार, मुंबई
मुंबईतील एक प्रमुख शनी मंदिर असून शनिदेवासोबत इतर देवतांचे दर्शन घडते.

सिद्धेश्वर शनी मंदिर (कल्याण, ठाणे)  
मुंबई आणि उपनगरातील भाविकांसाठी हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे मंदिर खूप जुने असून शनिवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. येथील वातावरण अतिशय शांत आणि प्रसन्न आहे.

शनी मंदिर (शनिवारवाडा, पुणे)
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या जवळ असलेले हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे. पुण्याच्या मध्यवस्तीत असल्याने येथे नेहमीच गर्दी असते. याला 'धाकटा शनी' असेही काही लोक संबोधतात.

बाणेश्वर शनी मंदिर (नाशिक)
पंचवटी क्षेत्राजवळ असलेले हे मंदिर नाशिकमधील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. कुंभमेळ्याच्या काळात या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त होते.
ALSO READ: शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

Shani Dev Jayanti महाराष्ट्रातील जागृत आणि प्रसिद्ध न्यायदेवता शनी मंदिरे

रजनीकांतच्या 'जेलर २' च्या सेटवर भीषण अपघात; विजेचा धक्का लागून क्रू मेंबरचा मृत्यू

कान्स चित्रपट महोत्सवात ट्रोल झाल्यानंतर सोनू सूद आलिया भट्टच्या समर्थनार्थ पुढे आले

मौनी रॉय आणि सूरज नंबियार यांनी एका संयुक्त निवेदनातून विभक्त होण्याची घोषणा करत, लग्नाच्या चार वर्षांनंतर आपला संसार संपवला

Madhuri Dixit Birthday Special एकेकाळी पॅथॉलॉजिस्ट बनण्याचे स्वप्न पाहिले होते; मग 'धक-धक गर्ल' म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली

पुढील लेख
Show comments