Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशातील सर्वात मोठे शिवलिंग मंदिर औरंगाबाद, महाराष्ट्रात तयार होत आहे, एलोरा लेण्याजवळ असलेल्या या भव्य मंदिरामध्ये सर्व 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती असतील.

The largest Shivling temple in the country is being constructed in Aurangabad
Webdunia
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (12:31 IST)
देशातील सर्वांत मोठे शिवलिंग मंदिर औरंगाबादमध्ये बांधले जात आहे, अजिंठा-एलोरा नावाच्या प्रसिद्ध पुरातत्त्विक लेण्यांविषयी आपल्या सर्वांना माहिती आहे. हे भव्य मंदिर वेरूळ, औरंगाबाद येथे एलोरा लेण्याजवळ आहे. या मंदिराच्या गर्भगृहात देशातील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती स्थापित केल्या जातील. या प्रतिकृतींचे बांधकाम उज्जैन, मध्य प्रदेशात केले जात आहे. एकाच वेळी 12 मूर्तींची प्रदक्षिणा सुलभ करण्यासाठी येथे विशेष प्रदक्षिणा मार्ग तयार केले जात आहेत
 
वेरूळच्या श्री विश्वकर्मा तीर्थधाम संकुलात सुमारे 28 वर्षांपासून हे काम सुरू आहे. या मंदिराचे बांधकाम 1995 मध्ये सुरू झाले. पूर्वी 108 फुटांचे शिवलिंग बांधण्याची योजना होती. परंतु आवश्यक निधी उभारता आला नाही. यामुळे 1999 मध्ये मंदिराचे बांधकाम थांबवावे लागले. गेल्या वर्षी पुन्हा मंदिराच्या कामाला गती मिळाली. आता मंदिर बांधणीचे हे काम शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे. या भव्य मंदिराचे बांधकाम 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
 
मंदिरात कसे पोहोचायचे?
औरंगाबाद रेल्वे स्थानकासाठी देशातील सर्व प्रमुख शहरांमधून रेल्वे सेवा उपलब्ध आहे. जर आपल्या शहरातून औरंगाबादला थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसेल, तर आपण मनमाड रेल्वे जंक्शनवर जाऊन तेथून औरंगाबादला येऊ शकता. औरंगाबाद जिल्ह्यात पोहोचल्यानंतर वेरूळच्या दिशेने जाणारा मार्ग धरावा लागतो. वेरूळहून कन्नडच्या वाटेवर श्री विश्वकर्मा मंदिर आहे. मंदिराचे भव्य शिवलिंग दूरदूरपर्यंत पसरल्याच्या अफाट कीर्तीमुळे कोणीही आपल्याला  इथला मार्ग सांगेल.
 
महेंद्र बापूंच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. महेंद्र बापू हे चांदोन, गुजरातचे रहिवासी आहेत. मंदिराचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याची दृश्ये अतिशय नयनरम्य असणार आहेत. मंदिर पूर्णपणे काळ्या रंगाचे असेल. पावसाळ्यात जेव्हा पाण्याचे थेंब ढगातून खाली पडतात आणि शिवलिंगावर अभिषेक करतील, तेव्हा ते दृश्य अप्रतिम दिसेल. मंदिराची उंची 60 फूट आणि शिवलिंगाची उंची 40 फूट आहे. संपूर्ण मंदिर परिसर 108 बाय 108 चौरस फूट असेल.
 
घृष्णेश्वर मंदिर कोणी बांधले?
औरंगाबादचे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग अर्थात घृष्णेश्वराचे मंदिर. पारंपारिक दक्षिण भारतीय वास्तुकलेचे हे उत्तम उदाहरण आहे. मंदिर लाल रंगाच्या खडकांनी बनलेले आहे. लाल रंगाचे दगड आणि खडकांनी बनवलेल्या मंदिराच्या भिंतींवर भगवान शिव आणि भगवान विष्णूचे दहा अवतार चित्रित केलेले आहेत. गर्भगृहाच्या पूर्वेला शिवलिंग आहे. त्याचबरोबर नंदीश्वराच्या मूर्तीचीही स्थापना केली जाते. देवी अहिल्याबाई होळकर यांनी हे मंदिर बांधले.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अजय देवगणच्या 'रेड 2' चा टीझर प्रदर्शित,आयकर अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसणार

तारक मेहता मध्ये अखेर दयाबेन परत येतीये?

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

सनी देओलचा 'लाहोर 1947' या वर्षी प्रदर्शित होणार

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

सर्व पहा

नवीन

व्हायरल गर्ल मोनालिसा हिला चित्रपट ऑफर करणाऱ्या दिग्दर्शकाला बलात्कार प्रकरणात अटक

'सिकंदर'च्या निर्मात्यांना धक्का, एचडी प्रिंटमध्ये चित्रपट ऑनलाइन लीक झाला

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर Omkareshwar Jyotirlinga

सलमान खानच्या सिकंदरने रिलीज होताच हा अद्भुत विक्रम केला!

'द भूतनी' मधील मौनी रॉय, संजय दत्त आणि पलक तिवारी यांचा फर्स्ट लूक प्रदर्शित

पुढील लेख
Show comments