Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'भारतरत्न’ हे ‘इलेक्शन गीमिक’ सुप्रिया सुळे

Webdunia
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019 (15:54 IST)
कल्याण : भारतरत्न हे सरकारचे इलेक्शन गिमिक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. कल्याणमध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या सभेनंतर त्यांनी ही टीका केली. भाजपने आपले संकल्प पत्र जाहीर केले असून यात स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणार असल्याचे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात आपण ही मागणी मागील २ ते ३ वर्षांपासून लोकसभेत करत होतो.
 
त्यावेळीही यांचेच सरकार होते, मग निवडणुका आल्यावरच यांना भारतरत्न का आठवला? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. भाजपचा संकल्पपत्र म्हणजे निव्वळ गाजरांचा पाऊस असल्याची टीकाही त्यांनी केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरून सध्या सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचे सांगत भुतकाळ पुन्हा उकरून काढण्यापेक्षा वर्तमानात आपल्यापुढे काय समस्या आहेत? त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच महाराष्ट्रात जर तुमचे इतके चांगले काम असेल, आणि पैलवान तयार असतील, तर दिल्लीवरून मॉनिटर कशाला बोलवावे लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा दावा करणाऱ्यांवर सपा आमदार रईस शेख यांनी निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

पुढील लेख
Show comments