rashifal-2026

श्री मंगळग्रह मंदिरातर्फे भाविकांसाठी ऑनलाईन अभिषेक बुकिंगची सुविधा

Webdunia
बुधवार, 1 मार्च 2023 (16:17 IST)
अमळनेर- येथील मंगळग्रह मंदिर हे अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थानांपैकी एक मंदिर आहे. महाराष्ट्रासह, भारतभरातील भाविक आपल्या श्रद्धेमुळे येथे दर्शन व अभिषेकासाठी येत असतात. भाविकांच्या सोयीसाठी मंदिरातर्फे आता ऑनलाईन अभिषेक बुकिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. भाविकांना अभिषेकासाठी व मंगळग्रह मंदिरावर यायचे असेल तर घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने अभिषेक बुकिंग करता येणे सहज शक्य झाले आहे. 
 
या प्रकारे करा ऑनलाईन बुकिंग
ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी गुगल वर जाऊन www.mangalgrahamandir.com या मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
अभिषेक बुकिंग या बटनावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 
हा फॉर्म भरल्यानंतर आपल्याला तात्काळ पावती देखील मिळेल. 
सदर पावती मंदिरातील ऑनलाईन बुकिंग काउंटरवर दाखविल्यास तात्काळ अभिषेक बुकिंग जाणार आहेत. 
 
यामुळे दूरवरून येणाऱ्या भाविकांना अत्यंत सोप्या पद्धतीने अभिषेक पावती मिळविणे सोपे झाले आहे. मंगळग्रह मंदिरात दर मंगळवारी अभिषेकासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे आल्यानंतर आता भाविकांना रांगेत उभे राहून अभिषेक पावती काढण्याची आवश्यकता नाही जे भाविक लांब पल्ल्यावरून येत असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अभिषेक बुकिंग करून अभिषेक करावेत असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्था तर्फे करण्यात आले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

आरती बुधवारची

बुधवारी काय करावं आणि काय नाही हे जाणून घेउ या

संक्रांतीला काय वाण द्यायचे? पहा या ५० युनिक वस्तूंची यादी

Pongal 2026: पोंगलला कोणत्या देवाची पूजा केली जाते? मुख्य नैवेद्य काय?

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments