Dharma Sangrah

मराठा मोर्चा : आमदारांच्या घरासमोर ठिय्या, थाळनाद आंदोलन

Webdunia
शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (17:29 IST)
मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. आता तो हिंसकही होत आहे. या आंदोलनात टप्प्याटप्प्याने मोहिमा राबवल्या जात आहेत. आधी निवेदने दिली. नंतर वर्षभर शिस्तीतले मूक मोर्चे काढण्यात आले. आता ठोक मोर्चाची भूमिका घेण्यात आली आहे. एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट मंत्री, आमदार आणि खासदारांच्या घरासमोर निदर्शने, ठिय्या आंदोलन करण्याचा उपक्रम सुरु आहे. परवा आ. अमित देशमुख यांच्या बाभळगावच्या घरासमोर ठिय्या आणि निदर्शने करण्यात आली. दरम्यान आ. अमित देशमुख गोव्याच्या दौर्‍यावर आहेत. ठिय्या आंदोलनावेळी आपण सर्वांशी बोललो असतो, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता असं आ. अमित देशमुख आजलातूरशी बोलताना म्हणाले. 
नाशिक : मराठा आरक्षण मुद्द्यावर आज सुरु असलेल्या ठोक  मोर्चाने आमदार देवयानी फरांदे यांच्या  निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन  केले आहे. सोबतच सरकारचा निषेध करत मोर्चात फुट पाडणाऱ्या सरकारने पुरावे सादर करावे की कोणी लाभाची मागणी केली आहे. सरकारने निलेश राणे यांच्या मागून कोणतीही खेळी करू नये असे सुद्धा आज मराठा ठोक मोर्चाने स्पष्ट केले आहे. 
 
समाजाच्या भावना लोकप्रतिनिधींनी सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने शनिवारी (दि.४)आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन केले.आरक्षणांसह इतर महत्वाच्या  मागण्यांसाठी  राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोब, थाळीनादासोहत ठिय्या आंदोलनाची मालिका सुरू केली आहे. 
 
आज शनिवारी आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर सुनिल बागूल यांच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आले आहे.सरकार मराठा समाजाता गैरसमज निर्माण करून फुट पाडण्याच्या हेतूने लुडबुड्यांचा वापर करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रक्रीयेला गती देण्यासह, बिनव्याजी कर्ज पुरवठा, छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती, सारथी यासारख्या निर्णयांची अंमलबजावणी तत्काळ करावी आदि मागण्या करतानाच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्या.आजच्या आंदोलनात करण गायकर, राजू देसले, तुषार जगताप, माधवी पाटील,पुजा धुमाळ, मनोरमा पाटील,चेतन शेलार, अ‍ॅड. शरद कोकाटे, शरद तुंगार आदी उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

व्हायरल व्हिडिओ वादावर गिरीश महाजन यांचे मौन सुटले; म्हणाले-"भाषा चुकीची होती, पण..."

LIVE: खर्गे यांच्या दहशतवादी वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रत्युत्तर

सदोष सिग्नलमुळे एकाच ट्रॅकवर दोन लोकल समोरासमोर आल्याने गोंधळ; स्टेशन मास्तर निलंबित

मालेगाव स्फोट प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने स्फोटातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली

मुंबई: पाणीटंचाईमुळे सर्व सर्व्हिस सेंटरमध्ये वाहन धुण्यावर बंदी; आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार

पुढील लेख
Show comments