suvichar

रिक्षाचालक जिद्दीने बनले महापौर, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता

Webdunia
शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (16:09 IST)
परी चिंचवड महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक घेण्यात आली असून, सत्ताधारी भाजपचे महापौरपदाचे उमेदवार राहुल जाधव यांना 80 मतं मिळाली आहेत. राष्ट्रवादी उमेदवार 33 मतं मिळाली आहेत. यावेळी राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक गैरहजर राहिले असून,  भाजपचेही ३ नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी झाले. उपमहापौरपदी भाजपच्याच सचिन चिंचवडे यांची निवड झाली आहे. त्यामुळे भाजपा गड राखण्यात यशस्वी झाला आहे. तर सांगली आणि जळगाव येथे नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपाची पूर्ण सत्ता आली असून, मराठा मोर्चा आणि याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
 
महापौर राहुल जाधव यांचा नगरसेवक ते थेट महापौर असा राजकीय कारकिर्दीचा चढता आलेख जरी दिसत असला तरी हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या जाधव यांनी आपल्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी पिंपरी चिंचवड शहरात तब्बल 5 वर्षे रिक्षा चालवलेली असून ते जिद्दीवर आज ते त्यांच्या शहराचे प्रथम नागरिक बनले आहेत.
 
पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेला रामराम केला व भाजपमध्ये प्रवेश केला. दादांचे कट्टर पाठीराखे असल्याने लगेच त्यांची स्थायी समितीवर वर्णीही लागली. स्थायीचे अध्यक्ष न झाल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. आता ते पिंपरी चिंचवडचे महापौर म्हणून काम करणार आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

म्हाडा मुंबई लॉटरी: २,६४० घरांसाठी तब्बल ८२ हजारांहून अधिक अर्ज! अर्ज भरण्यासाठी केवळ २ दिवस शिल्लक

LIVE: मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर: 'देवगिरी'वर तटकरे-भुजबळ यांच्यात खडाजंगी, पार्थ पवारांची तडकाफडकी एक्झिट

महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

पुढील लेख
Show comments