Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल असं म्हणत तरूणाची आत्महत्या

Webdunia
गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (09:49 IST)
बीडमध्ये मी मेल्यानंतर तरी केंद्र आणि राज्य सरकारला मराठ्यांच्या मुलांची कीव येईल आणि तेव्हा माझे मरण सार्थक होईल, अशी चिठ्ठी लिहून केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे (१८) या विद्यार्थ्याने गळफास घेतला. बारावीला चांगले गुण मिळाल्यानंतर त्याने नीटची परीक्षा दिली होती. 
 
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.नीटचा पेपर कठीण गेल्याने तो तणावात होता. त्यातून त्याने शेतातील झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात एक चिठ्ठी आढळून आली आहे. आरक्षणाच्या स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांनी सांगितल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे यांनी दिली.
 
चिठ्ठीत त्याने लिहिले असे :
 
मी एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा वैद्यकीयला नंबर लागणार नाही. खासगी महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षण घेण्याची माझी ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे, अशी चिठ्ठी विवेकने लिहिली आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

महायुतीमध्ये जागावाटपावरून रामदास आठवले यांनी केली मागणी

हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात गोंदिया जिल्ह्यात मेगा रॅली काढली

नाशिकात पतीने आत्महत्या केल्यानंतर पत्नीची मृतदेहासमोर तंत्रपूजा सुरू

पुण्यात मिरवणुकीत हाय टेंशन वायरला ध्वजाचा रॉड लागून विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

गाझामधील शाळेवर इस्रायली हवाई हल्ल्यात सात ठार

पुढील लेख
Show comments