Marathi Biodata Maker

श्री बहिरोबाची आरती

Webdunia
मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (12:57 IST)
जय देव जय देव जय भैरवनाथा ।
सुंदर पदयुग तूझें वंदिन निजमाथां ॥ ध्रु० ॥
भैरवनाथा गौरव दे मज भजनाचें ।
रौरव संकट नाशी जनना- निधनाचें ॥
निशिदिनिं देवा दे मज गुणकीर्तन वाचे ।
कैरवपदनखचंद्रीं करिं मन मम साचें ॥ जय० ॥ १ ॥
भवभयभंजन सज्ज्नरंजन गुरुदेवा ।
पदरज‍अंजन लेतां प्रगटे निज ठेवा ॥
जेव्हां दर्शन देसी भाग्योदय तेव्हां ।
अनंत पुण्यें लाधे आम्हां तव सेवा ॥ जय० ॥ २ ॥
कलिमलशमना दानवदमना दे पाणी ।
डमरूरव अमरांते निर्भय सुखदानी ।
काशीरक्षक तक्षकमालाधर चरणीं ।
तोडर मिरवी अरिंगन मस्तकिं मनकर्णी ॥ झय० ॥३ ॥
लक्षीं करुणाचक्षी अनुचर निजपक्षी ।
भक्षीं दुष्टां सुष्टां संरक्षीं ॥
साक्षी कर्माकर्मी ज्गदंतरकुक्षीं ।
मुमुक्षुपक्षी वसती तव पदसुरवृक्षीं ॥ जय० ॥ ४ ॥
सोनारीं पुरधामीं भैरव कुळस्वामी ।
स्मरतां सत्वर पावसि संकटहरनामीं ॥
इच्छित देसी दासां जो जो जें कामी ।
मुक्तेश्वरीम हेतू निश्चय कुळधर्मी ॥ जय० ॥ ५ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

चतुर्थी व्रत विशेष का आहे? उपवास केल्याने काय होते?

Artihara-stotram आर्तिहर स्तोत्रम् श्रिधर अय्यावाल्

सोळा सोमवार व्रत नियम

महादेव आरती संग्रह

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments